पुढारी ऑनलाईन डेस्क : दमदार स्टारकास्ट असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. (Club 52 )अमित कोळी दिग्दर्शित हा चित्रपट अॅक्शनपॅक्ड असून, हार्दिक जोशी धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. (Club 52)
संबंधित बातम्या –
Deepfake Video : डीपफेकविरुद्ध कारवाईसाठी सरकारने कंबर कसली, नवी नियमावली तयार करणार
Iffi 2023 : जसा समाज समृद्ध होईल तशी असमानता कमी झाली पाहिजे : अँटोनियो फरेरा
Animal Trailer: आला रे आला! रणबीर कपूर-रश्मिका मंदानाच्या ‘ॲनिमल’चा ट्रेलर आला
बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.
एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन “क्लब 52” या चित्रपटाला देण्यात आली आहे. टीजरवरून पत्त्यांचा डाव आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचा अंदाज बांधता येतो. चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट आहे.
The post “क्लब 52” चित्रपटाचा धमाकेदार टीजर , हार्दिक जोशी दमदार भूमिकेत appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : दमदार स्टारकास्ट असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. (Club 52 )अमित कोळी दिग्दर्शित हा चित्रपट अॅक्शनपॅक्ड असून, हार्दिक जोशी धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रात …
The post “क्लब 52” चित्रपटाचा धमाकेदार टीजर , हार्दिक जोशी दमदार भूमिकेत appeared first on पुढारी.