पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान विधानसभा निवडणूक ( Rajasthan Poll ) प्रचार सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. आता निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींना ‘पनौती’ आणि ‘पिकपॉकेट’ संबोधल्याप्रकरणी राहुल गांधींना 25 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
Rajasthan Poll : काय म्हणाले होते राहुल गांधी?
राजस्थानमधील विधानसभा निवडणूक प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अपशकुनी (पनौती ) आहेत. आमची मुले विश्वचषक शानदारपणे जिंकत आहेत. पण, पनौती असणार्या पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमुळे त्यांचा पराभव झाला. यावेळी राहुल गांधी यांनी एक किस्सा सांगताना तीन लोक खिसे कापण्यासाठी येतात. एक खिसा विचलित करण्याचा प्रयत्न करतो. दुसरा मागून आकारहीन खिसा कापतो. तिसरा पाहत उभा आहे असा उ्ल्लेख करत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्योगपती अदानी यांचा उल्लेख केला. याबाबतही त्यांना खुलासा करण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
भाजपने केली होती राहुल गांधींविरोधात तक्रार
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांच्यावर बोचरी टीका केल्यानंतर जप काँग्रेसवर हल्लाबोल झाला. भाजप नेत्यांनीही राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला होता. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींना राष्ट्रीय लज्जास्पद म्हटले होते. याप्रकरणी भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती.
हेही वाचा :
राहुल गांधी लालूंकडून शिकले चंपारण्य मटणाची रेसिपी
नेहरू म्युझियम नाव बदलावर राहुल गांधी म्हणाले, ‘नेहरु त्यांच्या नावासाठी…’
‘शरद पवार पंतप्रधान नाहीत’ : अदानी- पवार मैत्रीवर राहुल गांधी स्पष्टच बोलले | Rahul Gandhi on Pawar-Adani friendship
The post PM मोदींना ‘पनौती’ म्हणणे भोवले, राहुल गांधींना नोटीस appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान विधानसभा निवडणूक ( Rajasthan Poll ) प्रचार सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. आता निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींना ‘पनौती’ आणि ‘पिकपॉकेट’ संबोधल्याप्रकरणी राहुल गांधींना 25 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यास …
The post PM मोदींना ‘पनौती’ म्हणणे भोवले, राहुल गांधींना नोटीस appeared first on पुढारी.