फडणवीसांचा ‘सागर’ बंगला ठरतोय हालचालींचा केंद्रबिंदू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रखडलेले जागावाटप आणि जाहीर झालेल्या जागांवरील उमेदवारांच्या नावांवरून रंगलेल्या रुसव्याफुगव्यांनी सध्या महायुतीतील राजकीय बैठकांचे प्रमाण भलतेच वाढले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला सध्या भाजपसह महायुतीतील विविध नेत्यांसाठी खलबते करण्याचे ठिकाण बनले आहे. इच्छुक उमेदवारांसह नाराजांची रीघ इथे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी धाराशिव, यवतमाळ आणि दक्षिण मुंबईतील पदाधिकार्‍यांनी फडणवीसांची भेट … The post फडणवीसांचा ‘सागर’ बंगला ठरतोय हालचालींचा केंद्रबिंदू appeared first on पुढारी.

फडणवीसांचा ‘सागर’ बंगला ठरतोय हालचालींचा केंद्रबिंदू

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : रखडलेले जागावाटप आणि जाहीर झालेल्या जागांवरील उमेदवारांच्या नावांवरून रंगलेल्या रुसव्याफुगव्यांनी सध्या महायुतीतील राजकीय बैठकांचे प्रमाण भलतेच वाढले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला सध्या भाजपसह महायुतीतील विविध नेत्यांसाठी खलबते करण्याचे ठिकाण बनले आहे. इच्छुक उमेदवारांसह नाराजांची रीघ इथे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी धाराशिव, यवतमाळ आणि दक्षिण मुंबईतील पदाधिकार्‍यांनी फडणवीसांची भेट घेतली.
पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजपने वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, महायुतीतील जागावाटपाचा तिढा न सुटल्याने उर्वरित जागांबाबत निर्णय झालेला नाही. शिवाय, जाहीर झालेल्या काही जागांवरील उमेदवारांवरून नाराजीचे नाट्य सुरू झाले आहे. विशेषतः माढा, जळगाव, रावेर, नगर दक्षिणच्या उमेदवारीवरून नाराजीचे सूर उमटत आहेत. या नाराजीचा फटका टाळण्यासाठी स्वतः फडणवीस स्थानिक नेत्यांशी चर्चा करत आहेत. भाजपसोबतच मित्रपक्षांकडील जागांबाबतही फडणवीसांकडे खलबते सुरू आहेत. बारामतीत अजित पवार गटाचा मार्ग निर्धोक करण्यासाठी फडणवीसांना हर्षवर्धन पाटीलांसह स्थानिक पदाधिकार्‍यांंसोबत अलीकडेच चर्चा केली.
शुक्रवारी फडणवीसांनी धाराशिव, यवतमाळ आणि दक्षिण मुंबईबाबत बैठका घेतल्या. धाराशिवच्या जागेवर भाजप आणि शिवसेनेही दावा केला होता. मात्र, मंत्री तानाजी सावंत यांनी लोकसभा लढविण्यास नकार दिल्याने इथून भाजप माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना रिंगणात उतरवू शकते. परदेशी यांच्यासह आमदार राणा जगजित सिंह, अभिमन्यू पवार, माजी खासदार रवी गायकवाड यांनी फडणवीसांची भेट घेतली.
दुसरीकडे यवतमाळवरून शिंदे गटातील संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मंत्री संजय राठोड यांच्या नावासाठी भाजप आग्रही आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी ‘सागर’वर फडणवीस यांची भेट घेतली. दक्षिण मुंबईबाबत चर्चेसाठी
विधानसभा अध्यक्ष आणि संभाव्य उमेदवार राहुल नार्वेकर यांनी फडणवीसांची भेट घेतली. याशिवाय, सातारा, पुणे, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रामटेक आदी जागांबाबतही फडणवीसांनी संबंधित नेत्यांशी दोन दिवसांत चर्चा केली.
आज दिल्लीत बैठक
दिल्लीत शनिवारी भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दिवसभरात भाजपची महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय, महायुतीतील सुमारे 41 जागांवरील तिढा सुटला असून लवकरच अंतिम जागावाटप जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Latest Marathi News फडणवीसांचा ‘सागर’ बंगला ठरतोय हालचालींचा केंद्रबिंदू Brought to You By : Bharat Live News Media.