किती गंभीर आहे ‘ब्रेन ब्लीडिंग’? याप्रकारची डोकेदुखी देते ‘ब्रेन हॅमरेज’चे संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरातील प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव (सद्गुरु) ची इमरजेन्सी ब्रेन सर्जरीच्या वृत्ताने प्रत्येकाला धक्का दिला. सद्गुरुंवर brain-bleed- (ब्रेन हेमरेज) मुळे सर्जरी करावी लागली. जाणून घेऊया (Brain Bleed) ब्रेन ब्लीडिंग काय आहे, याचे लक्षण काय आहेत आणि हे किती धोकादायक आहे? (Brain Bleed ) जगभरात प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव (सद्गुरु) च्या … The post किती गंभीर आहे ‘ब्रेन ब्लीडिंग’? याप्रकारची डोकेदुखी देते ‘ब्रेन हॅमरेज’चे संकेत appeared first on पुढारी.
किती गंभीर आहे ‘ब्रेन ब्लीडिंग’? याप्रकारची डोकेदुखी देते ‘ब्रेन हॅमरेज’चे संकेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जगभरातील प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव (सद्गुरु) ची इमरजेन्सी ब्रेन सर्जरीच्या वृत्ताने प्रत्येकाला धक्का दिला. सद्गुरुंवर brain-bleed- (ब्रेन हेमरेज) मुळे सर्जरी करावी लागली. जाणून घेऊया (Brain Bleed) ब्रेन ब्लीडिंग काय आहे, याचे लक्षण काय आहेत आणि हे किती धोकादायक आहे? (Brain Bleed )
जगभरात प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव (सद्गुरु) च्या इमरजेन्सी ब्रेन सर्जरीचे वृत्त ऐकून त्य़ांचे अनुयायी आणि हितचिंतक चिंतेत आहेत. खरंतर, डोकेदुखीची सातत्याने समस्या झाल्यानंतर एमआरआय करण्यात आले. त्या रिपोर्टमधून समजले की, त्यांना ब्रेन ब्लीडिंग (ब्रेन हॅमरेज) ची समस्या झाली आहे. तत्काळ त्यांना सर्जरीसाठी नेण्यात आले. देश-परदेशातून सद्गुरुचे अनुयायी त्यांची प्रकृती ठिक होण्याची प्रार्थना करत आहेत.
सद्गुरु यांच्यावर ज्यामुळे ब्रेन सर्जरी झाली, त्यास मेडिकल सायन्समध्ये खूप धोकादायक मानले जाते. अशा स्थितीत जीव वाचवण्यासाठी तत्काळ सर्जरी करावी लागली. नाही तर मृत्यूला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. ब्रेन हॅमरेजमध्ये ब्रेन टीशू आणि कवटी यामध्ये ब्लीडिंग होत असते. केवळ ब्रेन टिशूच्या आतदेखील ब्लीडिंग होऊ शकते. हा स्ट्रोक मेंदू आणि कवटीच्या मध्ये रक्त जमा झाल्याचे कारणदेखील होऊ शकते.
याप्रकरणी एका वेबसाईटशी बोलताना अपोलो हॉस्पिटलचे सीनियर न्यूरो सर्जन सुधीर कुमार यांनी अनेक गंभीर गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, एकीकडे ब्रेन हॅमरेजमुळे डोक्याच्या प्रभावित भागात सूज येऊ शकते. ब्रेन स्ट्रक्चरवरदेखील दबाव पडू शकतो. ही एक इमरजन्सी कंडिशन आहे. यामध्ये रुग्णाचा जी वाचवणे किंवा विकलांगता थांबवण्यासाठी तत्काळ सर्जरीची आवश्यकता असते.
डॉक्टर सुधीर कुमार यांच्यानुसार, सामान्यपणे ब्रेन ब्लीडिंगच्या कंडीशनचे कारण पडणे किंवा ट्रामा असतो. त्याचसोबत ज्या लोकांना अनियंत्रित ब्लड प्रेशर असते, त्यांच्यासोबतही ही कंडीशन होऊ शकते. सोबतचं मेंदूत रक्ताचे धब्बे, ब्रेन ट्यूमर आणि ब्रेन इन्फेक्शन देखील याचे कारण होऊ शकते.
किती धोकादायक आहे ब्रेन हॅमरेज?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ही परिस्थितीत कंडीशन खूप धोकादायक आहे, ज्यामुळे रुग्णाला विकलांगता येऊ शकेत किंवा मृत्यू होऊ शकतो. एकदा मेंदूच्या पेशी मरून गेल्या की त्या परत येत नाहीत.
काय आहेत लक्षणे?
सातत्याने होणारी डोकेदुखी कारण होऊ शकते. तज्ज्ञ म्हणतात की, कोणत्याही कारणाशिवाय, गंभीर डोकेदुखीचा तपास करायला हवा. डोकेदुकीशिवाय अशक्तपणा, चेहरा, हात, पाय वा शरिराच्या कोणत्याही एका अवयवामध्ये लकवा मारणे, हेदेखील लक्षण असू शकते. याचसोबत अनेक रुग्ण चक्कर, उल्टी, अशक्तपणा, झोप न येणे, बोलण्यात अडथळा अशा प्रकारच्या समस्या होऊ शकतात.
काही रुग्णांना गिळताना त्रास होणे, विजन लॉस, शरीराचा संतुलन न राहणे यासारखी लक्षणे दिसून येतात. पण, सामान्यपणे पहिले लक्षण अचानक गंभीर डोकेदुखी होणे, मानली जाते.
सीटी स्कॅन, एमआरआय वा एमआरएमच्या माध्यमातून ब्रेन ब्लीडिंग ओळखले जाऊ शकते. सर्जरीची आवश्यकता किंवा औषधांनी ठिक करणे, हे रुग्णाची स्थिती पाहून डॉक्टर ठरवतात.
काय काळजी घ्यावी?
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा. तंबाखू आणि दारूचे सेवन करू नये. आपल्या जीवनशैलीत बदल करावा. जे शुगरचे रुग आहेत, त्यांनी आपले ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवावी.
The post किती गंभीर आहे ‘ब्रेन ब्लीडिंग’? याप्रकारची डोकेदुखी देते ‘ब्रेन हॅमरेज’चे संकेत appeared first on Bharat Live News Media.