RCBचे चेन्नईला 174 धावांचे लक्ष्य! रावत-कार्तिकची 95 धावांची भागीदारी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IPL 2024 CSKvsRCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने IPL-2024 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला (CSK) विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य दिले आहे. चेपॉक स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 173 धावा केल्या.
अनुज रावतने 25 चेंडूत 48 तर दिनेश कार्तिकने 26 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. दोघांनी 95 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी, कर्णधार फाफ डू प्लेसिस 35, विराट कोहली 21 आणि कॅमेरून ग्रीन 18 धावा करून बाद झाले. मुस्तफिजुर रहमानला 4 बळी मिळाले. दीपक चहरने एक विकेट घेतली.
बेंगळुरूचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
बेंगळुरूचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. मुस्तफिझूर रहमानने 12व्या षटकात दोन विकेट घेत बेंगळुरूची मधली फळी मोडीत काढली. त्याने 12व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅमरून ग्रीनला बोल्ड केले. ग्रीन 22 चेंडूत 18 धावा करून बाद झाला.
कोहली बाद
विराट कोहली 20 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. रहमानने त्याला रचिन रवींद्रकरवी झेलबाद केले.
कोहलीने मारला हंगामातील पहिला षटकार
विराट कोहलीने डावाच्या 10व्या षटकात आयपीएल हंगामातील पहिला षटकार लगावला. महिष तीक्षनाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला.
आरसीबीचे अर्धशतक
8व्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 50 धावांचा टप्पा ओलांडला. विराटने तीक्षनाच्या दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत संघाची धावसंख्या 50 च्या पुढे नेली.
कोहलीच्या 12 हजार टी-20 धावा पूर्ण
विराट कोहलीने आपल्या टी-20 कारकिर्दीत 12 हजार धावा पूर्ण केल्या. 7व्या षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर एकेरी धाव घेत त्याने हे यश संपादन केले.
मॅक्सवेल गोल्डन डक
सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दीपक चहरने ग्लेन मॅक्सवेलला विकेटकीपर धोनी करवी झेलबाद केले. मॅक्सवेल गोल्डन डक ठरला.
5 व्या षटकात दोन विकेट
आरसीबीला डू प्लेसिसच्या रुपात पहिला धक्का बसला. तो 23 चेंडूत 35 धावा करून माघारी परतला. रवींद्रने पहिला झेल घेतला. 5व्या षटकात मुस्तफिजुर रहमानचा चेंडू ड्युप्लेसिसने ऑफ साईडला डीप बॅकवर्ड पॉइंटवर खेळला. चेंडू हवेत राहिला. त्याचवेळी रचिन रवींद्रने धावत येत झेल घेतला. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मुस्तफिजुरने दुसरी विकेट मिळवली. त्याने रजत पाटीदारला विकेटकीपर धोनी करवी झेल बाद केले.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 खालीलप्रमाणे आहेत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज,
इम्पॅक्ट प्लेअर : यश दयाल, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, स्वप्नील सिंग, वैशाक विजय कुमार.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, महेश टेकशाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे
इम्पॅक्ट प्लेअर : शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, शेख रशीद, निशांत सिंधू, मोईन अली.
खेळपट्टी कशी आहे?
चेन्नईच्या चेपॉक मैदानावर IPL 2023 मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच सामने जिंकले होते. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने चार सामने जिंकले होते.
सलामीच्या सामन्यात सीएसके आणि आरसीबीचे रेकॉर्ड कसे आहे?
आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आठ वेळा हंगामातील सलामीचा सामना खेळला आहे. यातील संघाने चार सामने जिंकले आहेत. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे चार सलामीचे सामने खेळले आहेत. यातील तीन सामन्यांत पराभव झाला असून एक सामना जिंकला आहे. बेंगळुरूने IPL 2021 च्या ओपनिंग मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता.
आकडेवारीत सीएसकेचा वरचष्मा
आयपीएलच्या इतिहासात सीएसके आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये गतविजेत्या सीएसकेने 20 सामने जिंकले आहेत, तर आरसीबी संघ केवळ 10 सामने जिंकू शकला आहे. दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णित राहिला आहे. अशाप्रकारे आरसीबीच्या तुलनेत धोनीचा संघ वरचढ असल्याचे दिसते.
The post RCBचे चेन्नईला 174 धावांचे लक्ष्य! रावत-कार्तिकची 95 धावांची भागीदारी appeared first on Bharat Live News Media.