व्हीव्हीएस लक्ष्मण होतील टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक!
पुढारी ऑनलाईन डेस्क : VVS Laxman Head Coach : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ विश्वचषक फायनलनंतर संपुष्टात आला आहे. त्यांना आपला कार्यकाळ वाढवण्यात रस नसल्याने त्यांच्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण हे टीम इंडियाचे पुढील मुख्य प्रशिक्षक होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, द्रविड यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) पदभार स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली असून यासाठी त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) माहिती दिल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
Marlon Samuels Banned : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेपूर्वी ‘या’ क्रिकेटपटूवर 6 वर्षांची बंदी, ICCची मोठी कारवाई
Suryakumar Yadav Press : सूर्यावर पत्रकारांचा बहिष्कार? पत्रकार परिषदेला दोघेच हजर
द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात
19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये खेळलेला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना हा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा शेवटचा सामना होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. या फायनलनंतर द्रविड यांचा दोन वर्षांचा मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला.
द्रविड यांची नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ वनडे विश्वचषकानंतर संपला आहे. आता ते मुख्य प्रशिक्षक पदाचा करार वाढवणार की नाही याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. मात्र, त्याचवेळी द्रविड यांनी आपल्याला प्रशिक्षकाचा करार वाढवण्यात रस नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कळवल्याचे समजते आहे. त्यामुळे टीम इंडियाचा पुढचा मुख्य प्रशिक्षक कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
द्रविड यांचा मित्र होणार मुख्य प्रशिक्षक? (VVS Laxman Head Coach)
द्रविडच्या जागी आता त्यांचा जवळचा मित्र आणि माजी स्टायलिश भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक होतील अशी चर्चा सुरू आहे. लक्ष्मण हे सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ते बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचेही अध्यक्ष आहेत.
लक्ष्मण द. आफ्रिका दौऱ्यावरही मुख्य प्रशिक्षक?
लक्ष्मण हे यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत मुख्य प्रशिक्षक होते. याशिवाय, गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर त्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेतही मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली. त्यांनी वर्ल्डकपदरम्यान अहमदाबादमध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. त्याचा करार दीर्घ काळासाठी असू शकतो. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ते नियमित प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबत जाऊ शकतात. (VVS Laxman Head Coach)
कोचिंग स्टाफच्या इतर सदस्यांचे काय होणार?
द्रविड यांना मुख्य प्रशिक्षक बनवल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून लक्ष्मण हे एनसीएचे अध्यक्ष आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी द्रविड एनसीएचे प्रमुख होते. द्रविड यांना साथ देणा-या कोचिंग स्टाफच्या इतर सदस्यांचा कार्यकाळ वाढविला जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आहेत, तर पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत.
The post व्हीव्हीएस लक्ष्मण होतील टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक! appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : VVS Laxman Head Coach : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ विश्वचषक फायनलनंतर संपुष्टात आला आहे. त्यांना आपला कार्यकाळ वाढवण्यात रस नसल्याने त्यांच्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण हे टीम इंडियाचे पुढील मुख्य प्रशिक्षक होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, द्रविड यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) पदभार …
The post व्हीव्हीएस लक्ष्मण होतील टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक! appeared first on पुढारी.