
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चिन्ह मागितले आहे. गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोडरोलर या तीन चिन्हांची मागणी केली आहे. यापैकी एक चिन्ह वंचितला मिळण्याची शक्यता आहे. चिन्हासंदर्भात मागणी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर दिल्ली दौऱ्यावर आहेत.
वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होणार की नाही? हे अद्याप स्पष्ट नाही. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी दिल्ली गाठली आणि निवडणूक आयोगाकडे गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर या तीन चिन्हांची मागणी केली आहे. या तीन पैकी एक चिन्ह वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून राज्यातील सात जागांवर वंचित बहुजन आघाडी तुम्हाला पाठिंबा देईल, असे म्हटले होते. त्यांच्या या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाकडे लोकसभा निवडणुकीसाठी चिन्हांची मागणी केली आहे. आंबेडकरांनी मागणी केलेल्या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
‘केजरीवाल यांची अटक ही दडपशाही’
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात “केजरीवाल यांच्या बाबतीत पहिल्यांदा ठरवले पाहिजे की कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयावर प्रश्न विचारु शकता का? चौकशी करु शकता का? संविधानामध्ये कॅबिनेट निर्णय असताना न्यायालयात काॅल करता येत नाही. जेव्हा न्यायालयात काॅल करता येत नाही. तेव्हा चौकशीसुद्धा होत नाही, असे मी मानतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ते पहिल्यांदा ठरवावे, ही माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे. ईडीला या धोरणात्मक निर्णयाच्या प्रकरणात जाता येत नाही. त्यामुळे ही एका प्रकारची दडपशाही आहे.” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर दिली आहे.
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 : नागपूरसाठी तीन तर रामटेकसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल
Lok Sabha Election 2024 : उदयनराजे भोसले-अमित शाह भेट लांबणीवर, शनिवारी भेटीची शक्यता
Lok Sabha Election 2024 : ओडिशात भाजप स्वतंत्र लढणार! बीजेडीसोबतच्या जागावाटपाची चर्चा निष्फळ
The post Lok Sabha Election : ‘वंचित’ ची निवडणूक आयोगाकडे ‘या’ चिन्हाची मागणी appeared first on Bharat Live News Media.
