Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होणार शनिचरणी नतमस्तक
सोनई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 30 नोव्हेंबर रोजी शनिशिंगणापूरचा दौरा निश्चित झाला आहे. दौर्यादरम्यान चोख व्यवस्था ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बुधवारी दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नगर जिल्हा दौर्याच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथील जनसंपर्क कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिरादार उपस्थित होते.
राष्ट्रपती मुर्मू उदासी महाराज मठात अभिषेक व शनिमूर्तीस तेल अभिषेक करून दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शनिशिंगणापूर येथील भोजनालयातील महाप्रसाद घेणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौर्यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था, अद्ययावत आरोग्य पथकासह सर्व विभागांना सुविधांसह सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी या वेळी दिल्या. बैठकीस देवस्थानचे विश्वस्त, उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, शिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्यासह सर्व संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकार्यांसह शनैश्वर देवस्थानचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
Maratha Reservation | कुटुंबातील एकाची कुणबी नोंद हवी, रक्तातील इतरांनाही दाखला मिळणार
India vs Australia 1st T20I | भारत -ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिली टी-२० लढत, युवा खेळाडूंची कांगारुंसमोर अग्निपरीक्षा
The post Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होणार शनिचरणी नतमस्तक appeared first on पुढारी.
सोनई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 30 नोव्हेंबर रोजी शनिशिंगणापूरचा दौरा निश्चित झाला आहे. दौर्यादरम्यान चोख व्यवस्था ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बुधवारी दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नगर जिल्हा दौर्याच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथील जनसंपर्क कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक …
The post Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होणार शनिचरणी नतमस्तक appeared first on पुढारी.