शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे : आमदार नीलेश लंके

पारनेर :  पुढारी वृत्तसेवा :  ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे हे मलाच काय उभ्या महाराष्ट्राची इच्छा आहे, असे आमदार नीलेश लंके यांनी दर्गादर्शन यात्रेत खेड शिवापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आमदार लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित खेड शिवापूर येथील हजरत … The post शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे : आमदार नीलेश लंके appeared first on पुढारी.
#image_title

शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे : आमदार नीलेश लंके

पारनेर :  पुढारी वृत्तसेवा :  ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे हे मलाच काय उभ्या महाराष्ट्राची इच्छा आहे, असे आमदार नीलेश लंके यांनी दर्गादर्शन यात्रेत खेड शिवापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आमदार लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्गा दर्शन यात्रेस मुस्लिम माता भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संबंधित बातम्या :

Kolhapur Bus Accident : गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा कोल्हापूरजवळ अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार
वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती द्यावी ; महावितरणचे आवाहन

शरद पवार व अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे का असा प्रश्न आ. लंके यांना विचारण्यात आला असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.
नूर कुरेशी, फिरोज हवालदार, रमीज राजे, अन्वरभाई शेख, तौफिक पटेल, जब्बार शेख, मुजीब नवाब शेख, पाकीजा शेख, नगरसेवक डॉ. सादीक राजे, शेख इमरान, शेख अतिक, शाहरूख शेख आदींनी या यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. उपक्रम राबवायचा असेल तर त्यास टीम वर्क लागते. आमचे हे टीम वर्क जीवाभावाचे आहे. दिवाळी फराळाचे आमंत्रण देत जिल्ह्यातील गावागावांमध्ये आमची टीम दोन दिवसांत पोहोचली आणि 40 हजार पत्रिकांचे वितरण करण्यात आले. सामाजिक काम करताना प्रत्येक समाजाला आपण कसा न्याय देऊ शकू याचा प्रयत्न केला जातो. मतदारसंघात जातीय सलोखा राखण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत असतो. कोठेही जातीय तेढ निर्माण झाल्याचे उदाहरण घडत नाही, असे आ. नीलेश लंके या वेळी म्हणाले.
The post शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे : आमदार नीलेश लंके appeared first on पुढारी.

पारनेर :  पुढारी वृत्तसेवा :  ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे हे मलाच काय उभ्या महाराष्ट्राची इच्छा आहे, असे आमदार नीलेश लंके यांनी दर्गादर्शन यात्रेत खेड शिवापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आमदार लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित खेड शिवापूर येथील हजरत …

The post शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे : आमदार नीलेश लंके appeared first on पुढारी.

Go to Source