वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअॅपवर माहिती द्यावी
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, तारांचा झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्युज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणार्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस्अॅपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी 7875768074 हा व्हॉटस्अॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी 7875440455, कोल्हापूर- 7875769103, सांगली- 7875769449 आणि सातारा जिल्ह्यासाठी 7875768554 हा व्हॉटस्अॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या सर्व क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती, तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस् अॅपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस्अॅप नाही, त्यांनी ’एसएमएस’द्वारे संबंधित मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासोबतच 24 तास सुरू असणार्या 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 या महावितरणच्या टोल-फ—ी क्रमांकावर संपर्क साधता येईल. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
The post वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअॅपवर माहिती द्यावी appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, तारांचा झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्युज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणार्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉटस्अॅपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी …
The post वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअॅपवर माहिती द्यावी appeared first on पुढारी.