अलिबाग परिसरात बहरतेय दुर्मिळ सोनसावर

अलिबाग : किशोर सुद :  ऋतुराज वसंत ऋतुचे आगमन लवकरच होईल, त्यामुळे निसर्गात फुलांमुळे विविध रंग भरू लागले आहेत. अलिबाग तालुक्यातही जंगल भाग आणि आजूबाजूची वृश्रराजी वसंत ऋतुच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अलिबाग तालुक्यात धोकवडे, झिराड परिसरात दुर्मिळ अशी पिवळी काटेसावर पिवळ्या फुलांनी बहरली आहे. लाल काटेसावर सर्वत्र आढळून येते मात्र पिवळी काटेसावर … The post अलिबाग परिसरात बहरतेय दुर्मिळ सोनसावर appeared first on पुढारी.

अलिबाग परिसरात बहरतेय दुर्मिळ सोनसावर

अलिबाग : किशोर सुद :  ऋतुराज वसंत ऋतुचे आगमन लवकरच होईल, त्यामुळे निसर्गात फुलांमुळे विविध रंग भरू लागले आहेत. अलिबाग तालुक्यातही जंगल भाग आणि आजूबाजूची वृश्रराजी वसंत ऋतुच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अलिबाग तालुक्यात धोकवडे, झिराड परिसरात दुर्मिळ अशी पिवळी काटेसावर पिवळ्या फुलांनी बहरली आहे. लाल काटेसावर सर्वत्र आढळून येते मात्र पिवळी काटेसावर ही दुर्मिळ असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येते. काही ठिकाणी होळीनिमित्त काटेसावरीची कत्तल होत असल्याने सावरीची झाडे कमी होऊ लागली आहेत.
संबंधित बातम्या 

एकेकाळी पृथ्वीवर वीस लाख वर्षे पडत होता पाऊस!

Konkan Walaval Explore : फक्त समुद्र काय पाहता? ‘वालावल’ पण पाहा ना!
Pune News : महापालिकेसमोर बाप-लेकाचे उपोषण; प्रशासन झाले निष्ठुर

होळीनंतर वसंतोत्सवाला प्रारंभ होत असला तरी वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अवघा निसर्ग सज्ज झाला आहे. रानमाळावरील आणि डोंगरमाथ्यावरील मोठमोठे वृक्ष आपापल्या परीने सजले आहेत. यामध्ये काटेसावर, पळसाचे वृक्ष तर नखशिखांत बहरल्याने हा चैतन्य सोहळा नयनरम्य दिसत आहे. सध्या शिशिर ऋतूची पानगळही पाहायला मिळत आहे, तर डिसेंबरमध्ये पानगळ झालेल्या काटेसावरीला जानेवारीत कळ्या आल्या आणि बघता बघता लाल गडद आणि पिवळ्या धम्मक… होय पिवळ्या फुलांनी काटेसावर बहरली आहे. साधारणत सर्वत्र लाल काटेसावर आढळून येते. त्यामुळे सर्वांनाच लाल काटेसावरविषयी माहिती असते. मात्र पिवळी फुले येणारी काटेसावरीचे झाड क्वचित आढळून येते.
अलिबाग तालुक्यातही चांगली वनसंपदा आहे. तालुक्यात लाल काटेसावर आढळून येते. मात्र तालुक्यातील धोकवडे आणि झिराड परिसरात पिवळी काटेसावरची झाडे आहेत. सध्या ही पिवळी काटेसावर पिवळ्या फुलांनी डरडरून गेली आहे. लाल काटेसावर सर्वत्र आढळून येते मात्र पिवळी काटेसावर ही दुर्मिळ असल्याची माहिती वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे सदस्य समीर पालकर आणि निसर्गप्रेमी रुपेश गुरव यांनी माहिती देताना सांगितले. त्यामुळे अशा दुर्मिळ वनस्पतींचे जनत आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काटेरी वृक्ष पूर्ण भारतभर सगळ्याच जंगलात वाढलेले आढळतो. याचे पानझडी वृक्ष जंगल, डोंगरकपारी, रस्त्याच्या कडेला तसेच शेताच्या बांधावर उंच वाढलेले दिसतात. झाडाच्या मुळापासून ते उंच टोकापर्यंत टोकदार काटे असणार्‍या काटेसावर या झाडाची शाल्मली अशी देखील ओळख आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत सावरीची सगळी पाने गळून जातात. जानेवारीत अनेक कळ्या पानेविरहित फांदीवर दिसतात. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत सर्व झाड लाल गुलाबी फुलांनी बहरून जाते. काटेसावरीची झाडे 30 ते 45 मीटरपर्यत उंच वाढतात.
हे झाड खोडापासून टोकापर्यंत त्रिकोणी काट्यांनी लगडलेले असते. उन्हाळ्यात पानगळ झाल्यावर काटेसावरला लाल गुलाबी रंगाची फुलं येतात. गडद गुलाबी रंगाच्या पाच पाकळ्यांचं हे फुल आहे. या फुलाच्या मधात भरपूर असे पराग कण असतात. शाल्मली हे सुंदर दिसणारे फुल जितके छान दिसते, तितकेच ते खाण्यासाठी देखील चविष्ट आणि गुणकारी असल्याची माहिती वनस्पती शास्त्राचे अभ्यासक देतात.
काटेसावरीची लागते होळी
काही भागात काटेसावरीची होळी लावून तिचे दहन केले जाते. त्यामुळे होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात या झाडांची कत्तल करण्यात आली. जंगलात वणवा लागला, तर सगळ्यात शेवटी जळणारं झाड म्हणून देखील काटेसावरची ओळख आहे. यामुळेच काटेसावरीचे झाड तोडून होळीच्या मध्यभागी ठेवून त्याची पूजा केली जाते. दरवर्षी होळीच्या निमित्ताने काटेसावरीची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. जंगलातील काटेसावर नष्ट होऊ नयेत, होळीत जाण्यासाठी याचा वापर थांबावा, यासाठी जनजागृती आणि प्रयत्नांची गरज आहे.
अलिबाग परिसरात लाल आणि पांढर्‍या रंगाची फुले येणारी काटेसावर आढळून येते. पिवळी काटेसावर आढळून येत नाही. पिवळी काटेसावर दुर्मिळ आहे. पिवळ्या काटेसावरीला सोनसावर म्हणतात. सोनसावर महाबळेश्वर परिसरात, पश्चिम घाटाच्या वरच्या पटट्यात आढळून येते. अलिबाग परिसरात आढळून आली असेल तर वनविभागाकडून त्या झाडाची माहिती घेतली जाईल. ते झाड सोनसावरीचे असेल तर त्याची रोपे तयार करण्यासाठी बीज जमा केले जाईल.
नरेंद्र पाटील,?वन परिक्षेत्र अधिकारी, अलिबाग वन विभाग
Latest Marathi News अलिबाग परिसरात बहरतेय दुर्मिळ सोनसावर Brought to You By : Bharat Live News Media.