Pune Crime News : फरार शिंदे टोळी म्होरक्याला पिस्तुलासह बेड्या..

पुणे / बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर धारदार हत्यारांनी वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. त्या गुन्ह्यात मोक्काच्या गुन्ह्यात फरार झालेल्या शिंदे टोळी म्होरक्याला बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने पिस्तुलासह बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सौरभ शरद शिंदे (23, रा. बिबवेवाडी) असे … The post Pune Crime News : फरार शिंदे टोळी म्होरक्याला पिस्तुलासह बेड्या.. appeared first on पुढारी.

Pune Crime News : फरार शिंदे टोळी म्होरक्याला पिस्तुलासह बेड्या..

पुणे / बिबवेवाडी : Bharat Live News Media वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर धारदार हत्यारांनी वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. त्या गुन्ह्यात मोक्काच्या गुन्ह्यात फरार झालेल्या शिंदे टोळी म्होरक्याला बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने पिस्तुलासह बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सौरभ शरद शिंदे (23, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दि. 8 नोव्हेंबर रोजी प्रेम ऊर्फ यश कदम हा बाहेरून जेवण करून घरी येत असताना त्याच्या ओळखीचे आरेापी सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर, पंकज दिवेकर यांनी त्याला धरून अप्पर बिबवेवाडी येथील मैदानात नेऊन पूर्ववैमनस्यातून लोखंडी हत्यार, रॉडने हल्ला केला होता.
या प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होऊन नंतर मोक्काचीही कारवाई झाली आहे. मात्र या गुन्ह्यातील म्होरक्या सौरभ शिंदे हा फरार झाला होता. शोध घेत असताना पथकातील अंमलदार शिवाजी येवले यांना आरोपीची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलिस हवालदार बाळू शिरसट, शामराव लोहोमकर, संतोष जाधव, शिवाजी येवले, आशिष गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा

आईसाठी स्वतःच्या कातड्यापासून बनवली चप्पल
जाग आल्यावरही लोळत पडणे हानिकारक
लकवाग्रस्त व्यक्ती न्यूरालिंक ब्रेन चिपने खेळली बुद्धिबळ

Latest Marathi News Pune Crime News : फरार शिंदे टोळी म्होरक्याला पिस्तुलासह बेड्या.. Brought to You By : Bharat Live News Media.