Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) पुष्षक रॉकेटचे आज (दि.२२) यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपण वाहनाच्या यशस्वी चाचणीनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अंतराळयान प्रक्षेपण वाहन पुर्नवापर तंत्रज्ञानामध्ये मोठे यश मिळवले आहे. आज (दि.२२) सकाळी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी श्रेणीत ‘पुष्पक’ रॉकेट म्हणजेत इस्रोचे रिलॉन्च व्हेईकल यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरवण्यात इस्रोला यश आले. या संदर्भातील माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (ISRO Pushpak (RLV-TD)
यापूर्वीही ‘पुष्पक’ची चाचणी
पुष्पक रॉकेटचे हे तिसरे उड्डाण होते. 2016 मध्ये पुष्पक रॉकेटची पहिली चाचणी घेण्यात आली होती, जेव्हा ते बंगालच्या उपसागरात आभासी धावपट्टीवर उतरवण्यात आले होते. तथापि, ते पुन्हा पूर्णपणे बुडाले आणि पुन्हा सावरले नाही. दुसरी चाचणी 2023 मध्ये झाली, जेव्हा ते लँडिंगसाठी चिनूक हेलिकॉप्टरमधून सोडले गेले. त्यानंतर आज तिसऱ्यांदा पुष्पक ची चाचणी करण्यात आली. इस्रो या रॉकेटची सतत चाचणी करत आहे, जेणेकरून आव्हानात्मक परिस्थितीत त्याची क्षमता तपासता येईल. ISRO Pushpak (RLV-TD)
RLV ‘पुष्पक’ च्या पहिल्या दोन चाचण्याही यशस्वी
पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या पहिल्या दोन चाचण्याही यशस्वी झाल्या. इस्रोने यापूर्वी दोनदा RLV(पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन) यशस्वीरित्या उतरवले आहे. गेल्या वर्षी, इस्रोने रीयूजेबल लॉन्चिंग व्हीकल चाचणी दरम्यान, RLV हे वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून सुमारे साडेचार किलोमीटर उंचीवरून प्रक्षेपित केले होते. चाचणी दरम्यान, RLV धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरले. RLV ने ब्रेक पॅराशूट, लँडिंग गियर ब्रेक आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टमच्या मदतीने यशस्वी लँडिंग केले. पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या यशस्वी लँडिंगने नेव्हिगेशन, कंट्रोल सिस्टम, लँडिंग गियर आणि डिलेरेशन सिस्टम यासारख्या इस्रोने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या यशाची पुष्टी केली आहे.
RLV-LEX-02 Experiment:
🇮🇳ISRO nails it again!🎯
Pushpak (RLV-TD), the winged vehicle, landed autonomously with precision on the runway after being released from an off-nominal position.
🚁@IAF_MCC pic.twitter.com/IHNoSOUdRx
— ISRO (@isro) March 22, 2024
अंतराळ मोहिमा स्वस्त होतील; एस.सोमनाथ
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, भारतात पुष्पक प्रक्षेपण वाहन बनवणे हे भारताच्या अंतराळ मोहिमेला किफायतशीर बनवण्यासाठी एक मोठे आणि आव्हानात्मक पाऊल होते. प्रक्षेपण वाहनातच सर्वात महागडे इलेक्ट्रॉनिक्स भाग असतात. अशा परिस्थितीत, पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन बनून, हे वाहन मोहिमेच्या यशानंतर पृथ्वीवर परत सुरक्षितपणे उतरण्यास सक्षम असेल आणि पुढील मोहिमेत तेच प्रक्षेपण वाहन पुन्हा वापरता येईल. अंतराळातील कचरा कमी करण्याच्या दिशेने हे देखील एक महत्त्वाचे पाऊल आहे. ISRO Pushpak (RLV-TD)
हेही वाचा:
INSAT-3DS Mission: ISRO च्या ‘इनसॅट-थ्रीडीएस’ हवामान उपग्रहाने टिपली पृथ्वीची पहिल्यांदाच बहुरंगी छबी
ISRO Indian space station : ४०० टन वजन, ४ मॉड्यूल; ISRO चे पहिले ‘स्पेस स्टेशन’ असेल खूप खास, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये
ISRO Gaganyaan Mission: PM माेदींनी केली ‘अंतराळ’वारी करणार्या भारतीयांची घाेषणा
The post अंतराळयान प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानात इस्रोचे मोठे यश: ‘पुष्पक’ची चाचणी यशस्वी appeared first on Bharat Live News Media.