मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक: आप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीची नुकतिच घोषणा झाली. यानंतर आपसह अनेक पक्ष उमेदवार जाहीर करण्यात आणि निवडणूक प्रचाराचे नियोजन करण्यात व्यस्त असतानाच मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाली आहे. त्यामुळे हा पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्त्वाला मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर पक्षासह देशभरात संतप्ततेची लाट पसरली आहे. (Arvind Kejriwal) दिल्ली मद्य … The post मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक: आप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया appeared first on पुढारी.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक: आप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीची नुकतिच घोषणा झाली. यानंतर आपसह अनेक पक्ष उमेदवार जाहीर करण्यात आणि निवडणूक प्रचाराचे नियोजन करण्यात व्यस्त असतानाच मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक झाली आहे. त्यामुळे हा पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्त्वाला मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर पक्षासह देशभरात संतप्ततेची लाट पसरली आहे. (Arvind Kejriwal)
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी हायकोर्टाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिली. त्यानंतर ईडीचे पथक गुरुवारी (दि.२१) संध्याकाळी उशिरा अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. सुमारे 2 तासांच्या छाप्या आणि चौकशीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तपास यंत्रणेने अटक केली. केजरीवालांच्या अटकेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आप नेते आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून, त्यांनी केंद्र सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Arvind Kejriwal)
Arvind Kejriwal: देशात प्रथमच मुख्यमंत्र्याला अटक- मंत्री अतिषी
“देशात प्रथमच एका विद्यमान मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना Z+ सुरक्षा कवच आहे. आता ते केंद्र सरकारच्या ईडीच्या ताब्यात आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत आम्हाला काळजी आहे. असे मत मंत्री अतिषी यांनी एक्स पोस्ट करत सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देश में पहली बार एक sitting Chief Minister को गिरफ़्तार किया गया है। अरविंद केजरीवाल के पास Z+ security cover होता है। अब वो केंद्र सरकार की ED की कस्टडी में हैं। हमें उनके safety और security की चिंता है।
— Atishi (@AtishiAAP) March 22, 2024

व्यक्तीला अटक कराल, विचाराला कसे कैद कराल?: भगवंत मान
“तुम्ही अरविंद केजरीवाल यांना अटक कराल पण त्यांच्या विचारसरणीला तुम्ही कसे कैद कराल. अरविंद केजरीवाल ही एक व्यक्ती नसून, तो एक विचार आहे आणि आम्ही आमच्या नेत्याच्या पाठीशी खडकासारखे उभे आहोत…,इनक्लाब जिंदाबाद” असे X पोस्ट करत पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान स्पष्ट केले आहे.

“You will arrest Arvind Kejriwal but how will you arrest his thinking… Arvind Kejriwal is not a person but an idea and we stand with our leader like a rock…,” tweets Punjab CM and AAP leader Bhagwant Mann pic.twitter.com/r1QMmIkyBs
— ANI (@ANI) March 22, 2024

AAP भाजप मुख्यालयाबाहेर आंदोलन करणार?
दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की ‘आप’ने भाजपच्या मुख्यालयाबाहेर 10 वाजता आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. कामगारांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल. पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, कालची परिस्थिती लक्षात घेता, ईडी मुख्यालय आणि भाजप मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आपचे कार्यकर्ते पोहोचण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा:

Loksabha election 2024 : भाजपला फोडाफोडीचे उत्तर मिळेल : अनिल देशमुख
Sharad Pawar on Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक लढवणार का?; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
loksabha election : लिपिक संवर्गातील कर्मचारी निवडणूकीच्या दिमतीला !

 
 
The post मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक: आप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया appeared first on Bharat Live News Media.

Go to Source