पाकिस्‍तानमधील कराचीत ‘जैश-ए-मोहम्मद’च्‍या म्होरक्याचा खात्‍मा

पाकिस्‍तानमधील कराचीत ‘जैश-ए-मोहम्मद’च्‍या म्होरक्याचा खात्‍मा


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा निकटवर्ती आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना रहीम उल्ला तारिक याची कराचीमध्‍ये गोळा घालून हत्‍या करण्‍यात आली. तो भारताविरोधात जमलेल्या गर्दीला संबोधित करण्‍यापूर्वीच त्‍याचा खात्‍मा करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सागितले.
मागील आठवड्यातच ‘लष्कर-ए-तैयबा’चा प्रमुख हाफिज सईदचा जवळचा सहकारी ‘अक्रम खान ऊर्फ अक्रम गाझी’ याचीही पाकिस्तानातील बाजापूरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्‍या केली होती. विशेष म्‍हणजे, या वर्षीभरात आतापर्यंत पाकिस्‍तानात मारल्या गेलेल्या भारतविरोधी १९ वा दहशतवादी ठरला आहे.
गेल्या आठवड्यात जम्मूमधील सुंजवान आर्मी कॅम्पवर 2018 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जाणारा लष्कराचा दहशतवादी ख्वाजा शाहिद हा पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (PoJK) मध्ये मृतावस्थेत आढळून आला. ख्वाजा शाहिदचे अपहरण झाल्याच्या वृत्तानंतर काही दिवसांनी त्याचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला होता. गेल्या महिन्यात, जैश प्रमुख मसूद अझहरचा विश्वासू दाऊद मलिक याची उत्तर वझिरीस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली होती.
हेही वाचा : 

युद्धाने उद्‍ध्‍वस्‍त केले, आता पाकिस्‍तानेही लाथाडले! अफगाण नागरिकांवर ‘हद्दपारी’चा वरंवटा!
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद मलिकचा पाकिस्‍तानमध्‍ये खात्‍मा

The post पाकिस्‍तानमधील कराचीत ‘जैश-ए-मोहम्मद’च्‍या म्होरक्याचा खात्‍मा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा निकटवर्ती आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना रहीम उल्ला तारिक याची कराचीमध्‍ये गोळा घालून हत्‍या करण्‍यात आली. तो भारताविरोधात जमलेल्या गर्दीला संबोधित करण्‍यापूर्वीच त्‍याचा खात्‍मा करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सागितले. मागील आठवड्यातच ‘लष्कर-ए-तैयबा’चा प्रमुख हाफिज सईदचा जवळचा सहकारी ‘अक्रम खान ऊर्फ अक्रम गाझी’ याचीही पाकिस्तानातील …

The post पाकिस्‍तानमधील कराचीत ‘जैश-ए-मोहम्मद’च्‍या म्होरक्याचा खात्‍मा appeared first on पुढारी.

Go to Source