जळगाव : दोन गावठी पिस्टल, मॅक्झीनसह आरोपी ताब्यात
जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; जिल्ह्यातील भुसावळ शहरातील एमएच कॉलनीच्या कच्च्या रस्त्यावर दोन गावठी पिस्तूल मॅक्झीनसह एका आरोपीला स्कार्पिओ गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एक आरोपी फरार झालेला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातील एमएच कॉलनी परिसरातील कच्चा रोडवर एक इसम गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आवाडे यांना मिळाली या माहितीच्या आधारे सपोनि मंगेश गोंटला, पोहेकॉ विजय नेरकर, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ निलेश चौधरी, पोकॉ सचिन पोळ, पोकॉ संजीव मोरे, पोकॉ सागर वंजारी तयार करून आरोपीच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या.
भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. हद्दीतील एम ओ एच कॉलनी परिसरातील कच्चा रोडच्या बाजुला हॉटेल मधु गार्डन समोर मोकळ्या जागेत बंटी झरापकर हा मोटारसायकल क्रमांक एम एच 19 बी एल 1944 ने दोन गावठी पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने तसेच खरेदी करणारा योगेश नंदु सांगळे हा सिल्व्हर रंगाचे स्कार्पिओ गाडी नंबर एम एच 14 बिके 90 94 हिने ठिकाणी आला होता. पोलीस पथक घटनास्थळी आले असता ड्रायव्हरसीट वर बसलेला व त्याच्या बाजुला उभा असलेला इसम दिसुन आले. समोर ऊभा असलेला इसम हा पळून गेला. तर ड्रायव्हरसीटवर बसलेल्या आरोपीला पोलीस पथकाने पकडले त्याचे नाव विचारले असता योगेश नंदु सांगळे वय 29 रा. बीड बायपासजवळ नंदनवन कॉलनी, सातारा परिसर, छत्रपती संभाजी नगर, असे सांगितले. त्यास पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव बंटी उर्फ झरापकर रा. भुसावळ असे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीची अंगझडतीत कमरेला लावलेले दोन गावठी पिस्टल मॅक्झीनसह मिळुन आले सात हजार रुपये दोन लोखंडी गावठी पिस्टल मॅक्झीनसह, सर लाख रुपये सिल्वर रंगाची स्कार्पिओ गाडी चाळीस हजार रुपयाची होडा कंपनीची मोटरसायकल पंधराशे रुपये असा एकूण पाच लाख पंधराशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
The post जळगाव : दोन गावठी पिस्टल, मॅक्झीनसह आरोपी ताब्यात appeared first on पुढारी.
जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; जिल्ह्यातील भुसावळ शहरातील एमएच कॉलनीच्या कच्च्या रस्त्यावर दोन गावठी पिस्तूल मॅक्झीनसह एका आरोपीला स्कार्पिओ गाडीसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एक आरोपी फरार झालेला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातील एमएच कॉलनी परिसरातील कच्चा रोडवर एक इसम गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी …
The post जळगाव : दोन गावठी पिस्टल, मॅक्झीनसह आरोपी ताब्यात appeared first on पुढारी.