न्या. संदीप शिंदे समितीने घेतला मराठा-कुणबी अभिलेखाचा आढावा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती कालपासून विदर्भात आहे. काल बुधवारी अमरावतीला बैठक पार पडली असून आज गुरूवारी (दि.२३) रोजी नागपुरात विभागीय आढावा घेतला. संबंधित बातम्या  Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, … The post न्या. संदीप शिंदे समितीने घेतला मराठा-कुणबी अभिलेखाचा आढावा appeared first on पुढारी.
#image_title

न्या. संदीप शिंदे समितीने घेतला मराठा-कुणबी अभिलेखाचा आढावा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती कालपासून विदर्भात आहे. काल बुधवारी अमरावतीला बैठक पार पडली असून आज गुरूवारी (दि.२३) रोजी नागपुरात विभागीय आढावा घेतला.
संबंधित बातम्या 

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, पण Mamaearth चा शेअर बनला रॉकेट, काय कारण?

खंडेरायाला पूजा अभिषेक करून धनगर आरक्षणासाठी संकल्प
Tanveer Sangha : टीम ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचा खेळाडू! कोण आहे तन्‍वीर संघा?

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीत अपर आयुक्त माधवी खोडे-चौरे यांनी न्यायमूती शिंदे व समितीच्या सदस्यांचे स्वागत केले. उपायुक्त तथा विभागीय समन्वय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्यासह सर्व जिल्हयांचे जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते.
विधी व न्याय विभागाचे सहसचिव शेखर मुनघाटे, समिती कक्षाचे उपसचिव विजय पोवार, ॲड. ‍अभिजित पाटील, कक्ष अधिकारी माधुरी देशमुख, उमेश आकुर्डे आदींचीही यावेळी उपस्थिती होती. मराठवाडयात कुणबी नोंदी शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेनुसार संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विभागात समन्वय अधिकारी नेमण्यात आले.
तसेच विशेष कक्ष स्थापन करून नागरिकांकडून उपलब्ध पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्ताऐवज आदी जुन्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली. यानुसार तयार करण्यात आलेल्या जिल्हा निहाय अहवालासंदर्भात न्यायमूर्ती शिंदे यांनी हा आढावा घेतला आहे.
The post न्या. संदीप शिंदे समितीने घेतला मराठा-कुणबी अभिलेखाचा आढावा appeared first on पुढारी.

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती कालपासून विदर्भात आहे. काल बुधवारी अमरावतीला बैठक पार पडली असून आज गुरूवारी (दि.२३) रोजी नागपुरात विभागीय आढावा घेतला. संबंधित बातम्या  Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, …

The post न्या. संदीप शिंदे समितीने घेतला मराठा-कुणबी अभिलेखाचा आढावा appeared first on पुढारी.

Go to Source