उद्धव ठाकरेंच्या सांगलीतील सभास्थळानजीक भीषण आग!
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सांगलीत आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडत आहे. मात्र या सभेच्या मैदानाजवळच मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या सभेच्या नजीक मोठी आग लागल्याने गोंधळ निर्माण झाला. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे सभेनजीक ही आग लागल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या जन संवाद सभेच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर आहेत. मिरजेत आज त्यांची सभा पार पडणार आहे. या सभास्थळी उद्धव ठाकरे पोहोचले. दरम्यान कार्यकर्त्यांनी फाटाके उडवून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मात्र याच दरम्यान फटाक्यांतील एक ठिणगी बाजूच्या मैदानावर जाऊन पडली. या मैदानातील कागद, पाला पाचोळ्यावर ही ठिणगी पडल्याने भीषण आग लागली. या दुर्घटनेनंतर कार्यकर्त्यांची आग विझवण्यासाठी तारांबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. सभेदरम्यान घडलेल्या दुर्घटनेने परिसरात गर्दी निर्माण झाली.
सांगलीतील उद्धव ठाकरे यांच्या या मेळाव्यात सांगली लोकसभेची अधिकृत उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होणार का? याकडे लक्ष असणार आहे. या सभेसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
Latest Marathi News उद्धव ठाकरेंच्या सांगलीतील सभास्थळानजीक भीषण आग! Brought to You By : Bharat Live News Media.