Hate Speech | भाजप नेते आम. नितेश राणे, गीता जैन, टी. राजा अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भाजप नेते आमदार नितेश राणे, गीता जैन आणि तेलंगाणातील आमदार टी. राजा यांच्या विरोधात द्वेषपूर्ण गुन्हा नोंद केला जावा अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. मुंबईतील ५ नागरिकांनी ही याचिका दाखल केली आहे, यावर २७ मार्चला सुनावणी होणार आहे. (Hate Speech)
जानेवारी २०२४ला मुंबईतील मिरारोड येथील हिंसाचार प्रकरणी या याचिका दाखल करण्यात आलेली आहे. पोलिसांना या नेत्यांवर स्वतः कोणतीही एफआयआर दाखल न केल्याने ही याचिका दाखल केली असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. (Hate Speech)
Hate Speech: Plea in Bombay High Court seeks FIR against BJP’s Nitesh Rane, Geeta Jain and T Raja
report by @Neha_Jozie https://t.co/Ongt0wAi9U
— Bar & Bench (@barandbench) March 21, 2024
२१ जानेवारी २०२४मध्ये मिरारोड परिसरात हिंसाचार झाला होता. हा हिंसाचार सुरू असताना राणे आणि जैन यांनी अल्पसंख्याक समुदायाला धमक्या देणारे भाषण केले. तर २५ फेब्रुवारीला टी. राजा यांनी येथे एक रॅली आयोजित केली होती, त्या वेळी त्यांनी द्वेषपूर्ण भाषण केले होते. राणे यांनी गोवंडी आणि मालवणी या परिसरातही द्वेषपूर्ण भाषणे केली असे या याचिकेत म्हटले आहे.
स्थानिक नागरिकांनी या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी पोलिस स्टेशनला भेट दिली होती, पण हे गुन्हे दाखल झालेले नाहीत, असेही याचिकेत म्हटले आहे. या याचिकेत माध्यामांतील बातम्यांचा हवाला देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने द्वेषपूर्ण भाषांविरोधात पोलिसांनी स्वतःहून कारवाई केली पाहिजे, असे निर्देश दिलेले आहेत, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा
ठाणे : मिरारोडमध्ये ‘बुलडोझर कारवाई’; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
तब्बल ३९ वर्ष ठाकरेंसोबत होतो, त्यांची कुंडली माहितीय : नितेश राणे
Nitesh Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे खोटारडा माणूस : नितेश राणे
Latest Marathi News Hate Speech | भाजप नेते आम. नितेश राणे, गीता जैन, टी. राजा अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका Brought to You By : Bharat Live News Media.