गोंदिया : महिलेचे दागिने लुटून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेचे दागिने लुटून तिचा धारधार शस्त्राने खून करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज (दि.२१) जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यशवंत भाऊलाल लिल्हारे, (वय ३२ वर्षे, रा. पिपरिया, ता. तिरोडा, जि. गोंदिया) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ११ … The post गोंदिया : महिलेचे दागिने लुटून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.

गोंदिया : महिलेचे दागिने लुटून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेचे दागिने लुटून तिचा धारधार शस्त्राने खून करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज (दि.२१) जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यशवंत भाऊलाल लिल्हारे, (वय ३२ वर्षे, रा. पिपरिया, ता. तिरोडा, जि. गोंदिया) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ११ एप्रिल २०२९ रोजी गोंदियात घडली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, अंतकला तेजराम सेलोकर, (वय ४३) ही महिला ११ एप्रिल २०१९ रोजी गुरे चारण्यासाठी गुरांना घेऊन आपल्या शेतात गेली होती. सकाळी ८ च्या सुमारास ही महिला एकटी असल्याचे पाहून आरोपीने काठीसह धारधार शस्त्राने तिच्यावर हल्ला करीत तिला गंभीर जखमी केले. व तिच्या गळ्यातील २१ हजार किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला. पती तेजराम सेलोकर शेतावर गेले असता अंतकला रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत आढळून आली. यावेळी तेजराम यांनी घटनेविषयी विचारणा केली असता तिने घडलेल्या घटनेची माहिती दिली. ही घटना ११ एप्रिल २०१९ रोजी घडली होती. दरम्यान, तेजाराम यांनी पत्नी अंतकला हिला उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान २१ मे २०१९ रोजी तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पती तेजराम तुलाराम सेलोकर (वय ५०, रा. खैरलांजी, पो. परसवाडा, ता. तिरोडा, जि. गोंदिया) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दवणीवाडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध कलम ३०२, ३९७ भा.दं.वि.अंतर्गत गुन्हा नोंदवून तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक जयदिप विष्णू दळवी यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. याप्रकरणी आरोपीविरूद्धात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता महेश एस. चंदवानी व अति. सरकारी अभियोक्ता कृष्णा डी. पारधी यांनी काम पाहिले. व एकुण १८ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली. एकंदरित आरोपी व फिर्यादीचे वकील यांच्या युक्तीवादानंतर तसेच कागदोपत्री पुरावा व वैद्यकीय अहवाल या आधारावर जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एम. खान यांनी सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपीला १० हजार दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हेही वाचा :

अफगाणिस्तान : आत्मघातकी हल्ल्याने कंदहार हादरले, 21 जणांचा मृत्यू
Rajasthan : सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू
धक्कादायक! पोहताना दमछाक होऊन युवकाचा मृत्यू ; चासकमान धरणात सापडला मृतदेह

Latest Marathi News गोंदिया : महिलेचे दागिने लुटून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा Brought to You By : Bharat Live News Media.