धाराशिव : उमरगातील पाच गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू

उमरगा (धाराशिव) : तालुक्यातील पाच गावात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून ५१ गावे तहानलेली आहेत. नागरिकांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. दररोज नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ५१ गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने ११६ अधिग्रहनाचे प्रस्ताव तयार करून तहसीलकडे सादर केले असून त्यापैकी ३१ गावच्या ८४ प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. … The post धाराशिव : उमरगातील पाच गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू appeared first on पुढारी.

धाराशिव : उमरगातील पाच गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू

गो.ल.कांबळे

उमरगा (धाराशिव) : तालुक्यातील पाच गावात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून ५१ गावे तहानलेली आहेत. नागरिकांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. दररोज नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ५१ गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने ११६ अधिग्रहनाचे प्रस्ताव तयार करून तहसीलकडे सादर केले असून त्यापैकी ३१ गावच्या ८४ प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. उर्वरित २० गावातील ३२ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
पाच गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कलदेव निंबाळा येथील टँकरचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून कोराळ येथील प्रस्ताव मंजुरीच्या प्रोसेसमध्ये आहे. नारंगवाडीत दोन, कडदोरा दोन, पेठसांगवी एक, असे पाच टँकर चालू आहेत. गावातील पाणी साठ्यातील पाणी पूर्णतः आटले असून नागरिकांना घागरभर पाण्यासाठी कोसो दूर जाऊन पाणी आणावे लागत आहे. वाढलेली उन्हाची तीव्रता आणि पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.
तालुक्यातील जवळगा, चिरेवाडी, केसर जवळगा, नारंगवाडीची वाडी, नारंगवाडी, येळी, बलसूर, भुसणी, एकुरगा, एकुरगावाडी, दाळिंब, काळनिंबाळा, जकेकुरवाडी, पेठसांगवी, कसगी, गुगळगाव, गुगळगाववाडी , तुगाव, रामपूर, नाईकनगर, सुपतगाव, गुरूवाडी, मुळज तांडा, त्रिकोळी,चिंचोली भुयार, कोथळी, दावलमलिकवाडी, भगतवाडी, कलदेव निंबाळा या ३१ गावात ८४ अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
एक हजार लिटर पाण्यासाठी पाचशे रुपये
टँकरने पाणी विकत घेऊन शहरात राहणाऱ्या नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. एक हजार लिटर पाण्यासाठी पाचशे रुपये मोजावे लागत आहेत. केवळ पाण्यासाठी वणवण करावे लागत असून शासनाने पाण्याच्या नियोजनास प्राधान्य देऊन नागरिकांची तहान भागवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
हेही वाचा :

Jalgaon News | रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा
Jalgaon Crime News | बनावट ग्राहक पाठवून कुंटणखाण्यावर छापा; 50 पिडीत महिलांची सुटका, 11 जणींना अटक
शिवनेरीवर प्लास्टिकबंदी; वन विभाग व पुरातत्व विभागाचा निर्णय

Latest Marathi News धाराशिव : उमरगातील पाच गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू Brought to You By : Bharat Live News Media.