रवी राणा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना; राजकीय चर्चांना उधाण
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (दि.२०) भेट झाल्यानंतर आमदार रवी राणा मुंबईसाठी रवाना झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे. आपण मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आमदार राणा यांनी यावेळी स्पष्ट केले.
अमरावती विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची रवी राणा यांनी बुधवारी (दि.२०) भेट घेतली होती. त्यानंतर जिल्ह्यातील विकासकामे आणि राजकीय विषयानिमित्त मी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आम्ही एनडीएचेच घटक आहोत, त्यासाठी भेट घेणार आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीच्या जागेसंदर्भात अंतिम निर्णय घेतील, खासदार नवनीत राणा यांनी कोणत्या चिन्हावर आणि कोणत्या पक्षाकडून लढले पाहिजे? एनडीएचे घटक म्हणून लढले पाहिजे की, भाजपचे उमेदवार म्हणून लढले पाहिजे? हा वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, त्याचं स्वागत केलं जाईल. युवा स्वाभिमान पार्टी एनडीएचा घटक म्हणून भाजपसोबत उभे राहून प्रचंड मताने भाजपचा उमेदवार निवडून देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.
अमरावती जिल्ह्याचे एकनाथ शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आमच्यासोबतच आहेत. आम्ही सगळे मिळून एनडीएसोबत आहोत. आणि भाजपचा उमेदवार तिथे उभा राहिला तर आम्ही सगळे मिळून तिथे काम करू आणि भाजपच्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ असेही आमदार राणा यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :
Kolhapur Lok Sabha elections 2024 | उद्धव ठाकरेंनी घेतली शाहू महाराज छत्रपतींची भेट, कोल्हापुरातून उमेदवारीची केली घोषणा
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत पोलिसांचे संचलन
Lok Sabha elections 2024 : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात जागा वाटपाचा तिढा
Latest Marathi News रवी राणा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना; राजकीय चर्चांना उधाण Brought to You By : Bharat Live News Media.