रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा

जळगाव : भुसावळ शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनीत राहणाऱ्या दोघा भावांना रेल्वेमध्ये टीसी ची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोघा भावांची तीस लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दि. 20 रोजी भुसावळ शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील रेल्वे नार्थ कॉलनीत राहणारे महेंद्र प्रकाश संसारे वय ४० हा तरूण आपल्या कुटुंबासह … The post रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा appeared first on पुढारी.
रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा

जळगाव : भुसावळ शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनीत राहणाऱ्या दोघा भावांना रेल्वेमध्ये टीसी ची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोघा भावांची तीस लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दि. 20 रोजी भुसावळ शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील रेल्वे नार्थ कॉलनीत राहणारे महेंद्र प्रकाश संसारे वय ४० हा तरूण आपल्या कुटुंबासह राहतो. तर शांतीनगर येथे राहणारे संशयित आरोपी सागर शिवदास वानखेडे यांनी आपली रेल्वेच्या मोठ्या अधिकाऱ्याशी चांगली ओळख आहे व रेल्वेमंत्री यांच्याशी ओळख असल्याचे सांगून महेंद्र संसारे व त्याचा भाऊ सचिन संसारे यांना रेल्वेतील टीसी या पदावर नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून 2 मे 2017 ते डिसेंबर 2023 या काळात वेळोवेळी पैसे घेतले असे एकूण 30 लाख रुपये घेऊनही दोघा भावांना रेल्वेत नोकरी लावून दिली नाही व वारंवार वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महेंद्र संसारे यांनी 20 मार्च रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन संशयित आरोपी सागर शिवदास वानखेडे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हे करीत आहे.

रोहीणी खडसे : खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो हा आचारसंहितेचा भंग
Sadhguru Jaggi Vasudev : सद्गुरु जग्गी वासुदेव यांची ब्रेन सर्जरी, प्रकृतीबाबत मुलीने दिली अपडेट

Latest Marathi News रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा Brought to You By : Bharat Live News Media.