तब्बल 20 लाख रुपयांचा शर्ट!

लंडन : एखाद्या शर्टला जास्तीत जास्त किती किंमत मिळेल, असे तुम्हाला वाटते? लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात एक शर्ट 25000 डॉलरला म्हणजेच 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकला गेलाय. जर खरेदीदाराचा प्रीमियम देखील जोडला गेला, तर ही रक्कम 26,36,263 रुपये होते. आता सर्वांनाच असा प्रश्न पडला असेल की, या शर्टमध्ये एवढं खास काय आहे की, ज्याची … The post तब्बल 20 लाख रुपयांचा शर्ट! appeared first on पुढारी.

तब्बल 20 लाख रुपयांचा शर्ट!

लंडन : एखाद्या शर्टला जास्तीत जास्त किती किंमत मिळेल, असे तुम्हाला वाटते? लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात एक शर्ट 25000 डॉलरला म्हणजेच 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकला गेलाय. जर खरेदीदाराचा प्रीमियम देखील जोडला गेला, तर ही रक्कम 26,36,263 रुपये होते. आता सर्वांनाच असा प्रश्न पडला असेल की, या शर्टमध्ये एवढं खास काय आहे की, ज्याची किंमत इतकी आहे. तर जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती…
लंडनमध्ये एका शर्टचा 20,000 पौंड म्हणजेच 25,000 डॉलर्समध्ये लिलाव करण्यात आला. जर भारतीय रुपयांमध्ये पाहिले तर त्याची किंमत सुमारे 20,69,491 रुपये आहे. 1995 च्या बीबीसी शो प्राईड अँड प्रिज्युडिसमध्ये अभिनेता कॉलिन फर्थने हा शर्ट घातला होता. यामध्ये फर्थने मिस्टर डार्सीची भूमिका केली होती. लिलावापूर्वी त्याची अंदाजे किंमत 7000 ते 10 हजार पौंड असल्याचे मानले जात होते.
अलीकडेच झालेल्या या लिलावात 60 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही पोशाखांची विक्री झाली. यामध्ये मॅडोना, मार्गोट रॉबी आणि जॉनी डेप यांनी परिधान केलेल्या कपड्यांचा समावेश होता. पण सर्वात मोठा फटका कॉलिन फर्थने प्राईड अँड प्रिज्युडिसमध्ये घातलेल्या पांढर्‍या शर्टला बसला आहे.
Latest Marathi News तब्बल 20 लाख रुपयांचा शर्ट! Brought to You By : Bharat Live News Media.