मधाच्या निर्यातीमध्ये ‘हे’ देश आहेत आघाडीवर

नवी दिल्ली : या पृथ्वीतलावरील सर्वात प्राचीन अन्नापैकी एक म्हणजे मध. मध हा अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असतो व तो अधिक काळ टिकूनही राहतो. त्यामुळे मानवासह अनेक प्राण्यांच्या आहारात मध असतो. जगातील अनेक देश मोठ्या प्रमाणात मधाचे उत्पादन करतात. पण जगात सर्वाधिक मध उत्पादन करणारा देश तुम्हाला माहितेय का? तर छोटासा असणारा न्यूझीलंड हा देश … The post मधाच्या निर्यातीमध्ये ‘हे’ देश आहेत आघाडीवर appeared first on पुढारी.

मधाच्या निर्यातीमध्ये ‘हे’ देश आहेत आघाडीवर

नवी दिल्ली : या पृथ्वीतलावरील सर्वात प्राचीन अन्नापैकी एक म्हणजे मध. मध हा अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असतो व तो अधिक काळ टिकूनही राहतो. त्यामुळे मानवासह अनेक प्राण्यांच्या आहारात मध असतो. जगातील अनेक देश मोठ्या प्रमाणात मधाचे उत्पादन करतात. पण जगात सर्वाधिक मध उत्पादन करणारा देश तुम्हाला माहितेय का? तर छोटासा असणारा न्यूझीलंड हा देश मध उत्पादन आणि निर्यातीत आघाडीवर आहे. हा देश सुमारे 275 कोटी रुपयांचा मध निर्यात करतो. भारतातही मधाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जाणून घेऊयात मध उत्पादनात आघाडीवर असणार्‍या देशांची माहिती.
भारतात मधाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण मध निर्यातीच्या बाबतीत भारत जगात 9 व्या क्रमांकावर आहे. देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, बिहार आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये मधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. जगात सर्वाधिक मध निर्यात न्यूझीलंड करतो. या छोट्या देशाने 2022 मध्ये 333.34 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 275 कोटी रुपयांचा मध निर्यात केला. जगातील नैसर्गिक मध निर्यातीत न्यूझीलंडचा वाटा सुमारे 12 टक्के आहे. मनुका मध निर्यात करणारा न्यूझीलंड हा जगातील एकमेव देश आहे. मधमाशा हा मध विशेष प्रकारच्या फुलापासून बनवतात. यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. या कारणास्तव, जगभरातील अनेक देशांमध्ये याला मोठी मागणी आहे. ते खूप महाग विकले जाते. भारतात, त्याच्या 350 ग्रॅम पॅकची किंमत सुमारे 4,000 रुपये आहे. न्यूझीलंडच्या एकूण मध निर्यातीच्या कमाईमध्ये मनुका मधाचा वाटा 82 टक्के आहे.
मध निर्यातीच्या बाबतीत न्यूझीलंडनंतर चीनचा दुसरा क्रमांक लागतो. चीन दरवर्षी सुमारे 229.6 दशलक्ष डॉलर्सचा मध निर्यात करतो. चीनमध्ये दरवर्षी 500,000 टन मधाचे उत्पादन होते. जगातील एकूण मध उत्पादनापैकी एक चतुर्थांश मधाचे उत्पादन चीनमध्ये होते. या यादीत अर्जेंटिना तिसर्‍या क्रमांकावर आहे. या देशाने 2020 मध्ये 179.5 दशलक्ष डॉलर किमतीचा मध निर्यात केला. या देशातून दरवर्षी सुमारे 75000 टन मधाची निर्यात होते. अर्जेंटिनातील मध हा उच्च दर्जाचा मानला जातो. युरोपीय देश जर्मनी आणि युक्रेन हेही मध निर्यात करणार्‍या पहिल्या पाच देशांमध्ये आहेत. यानंतर स्पेन, ब्राझील आणि हंगेरीचा क्रमांक लागतो. मध निर्यातीत भारताता 9 वा क्रमांक लागतो. त्यानंतर व्हिएतनामचा क्रमांक लागतो.
Latest Marathi News मधाच्या निर्यातीमध्ये ‘हे’ देश आहेत आघाडीवर Brought to You By : Bharat Live News Media.