मार्च एन्ड : एसबीआय बॅंक 31 मार्चला मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- वित्तीय वर्षाचे शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी रविवारी (दि. ३१) भारतीय स्टेट बँकेच्या शाखा रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानूसार एसबीआयच्या कोषागार शाखा, नाशिकरोड व देवळाली कॅम्प शाखा तसेच तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या उपकोषागार शासकीय व्यवहारास प्राधिकृत केलेल्या स्टेट बँकेची शाखा व बँक ऑफ बडोदाची सुरगाणा शाखा ही मार्च एन्डींगला
मध्यरात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्रमांक 409 अन्वये हे आदेश निर्गमित केले आहेत.
शासनाकडून विविध शासकीय विभाग व कार्यालयांना वित्तीय वर्ष अखेरच्या दिवशी उशिरापर्यंत प्राप्त झालेले अनुदान खर्ची टाकून जिल्हा कोषागार व तालुका उपकोषागार कार्यालयाकडून वितरीत होणारी देयके व धनादेश शासकीय व्यवहार होणाऱ्या बँकेत वटवून रक्कम काढणे व शासनाकडे महसुली उत्पन्नाच्या रकमा भरणा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने वर नमूद स्टेट बँक शाखांसह बँक ऑफ बडोदा, सुरगाणा शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा :
शिरवली, कांबळेश्वरचा पाणी प्रश्न मिटणार; जलजीवन योजनेचे 40 टक्के काम पूर्ण
Dhule News : पांझराकान साखर कारखाना वाचविण्यासाठी आम्ही जनतेसोबत : डॉ. तुळशीराम गावित यांची ग्वाही
Latest Marathi News मार्च एन्ड : एसबीआय बॅंक 31 मार्चला मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार Brought to You By : Bharat Live News Media.