मनसेला आपल्‍या कोट्यातून जागा देण्‍यास भाजपचा नकार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महायुतीत सहभागी होण्‍यासाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज ( दि. २१ मार्च ) मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी चर्चा केली. दरम्‍यान, या चर्चेत भाजप राज ठाकरे यांना आपल्‍या कोट्यातून लोकसभेची जागा देण्‍यास भाजपने नकार दिल्‍याचे समजते. मुंबईत आज एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस … The post मनसेला आपल्‍या कोट्यातून जागा देण्‍यास भाजपचा नकार appeared first on पुढारी.

मनसेला आपल्‍या कोट्यातून जागा देण्‍यास भाजपचा नकार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : महायुतीत सहभागी होण्‍यासाठी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज ( दि. २१ मार्च ) मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी चर्चा केली. दरम्‍यान, या चर्चेत भाजप राज ठाकरे यांना आपल्‍या कोट्यातून लोकसभेची जागा देण्‍यास भाजपने नकार दिल्‍याचे समजते.
मुंबईत आज एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्‍यात आज सुमारे दीड तास चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीसाठी मनसे लाेकसभेच्‍या दोन जागा मागितल्‍या. यावेळी  भाजपने राज ठाकरे यांना आपल्‍या कोट्यातून जागा देण्‍यास नकार दिल्‍याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्‍या शिवसेनेच्‍या वाट्याला येणार्‍या जागांमधून मनसेला जागा देण्‍यात याव्‍यात, अशीही चर्चा झाल्‍याचे समजते.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्‍याबराेबर झालेल्‍या चर्चेनंतर राज ठाकरे मनसे पदाधिकार्‍यांबराेबर चर्चा करणार आहेत. यानंतर मनसे महायुतीत सहभागी होणार का, कोणत्‍या मतदारसंघातून निवडणूक लढविणार याबाबतची अधिकृत घाेषणा हाेईल, अशी शक्‍यता व्‍आहे.
 
Latest Marathi News मनसेला आपल्‍या कोट्यातून जागा देण्‍यास भाजपचा नकार Brought to You By : Bharat Live News Media.