सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील जयपूर शहरात आज (दि.२१) सकाळी घरामध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने तीन अल्पवयीन मुलांसह कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेतील मृत बिहारमधील असल्याचे समोर आले आहे. (Rajasthan) Rajasthan : एकाच कुटूंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील कुटूंब हे कुटुंब मूळचे बिहारचे असून, राजस्थानमधील जयपूरला … The post सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील जयपूर शहरात आज (दि.२१) सकाळी घरामध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने तीन अल्पवयीन मुलांसह कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेतील मृत बिहारमधील असल्याचे समोर आले आहे. (Rajasthan)
Rajasthan : एकाच कुटूंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील कुटूंब हे कुटुंब मूळचे बिहारचे असून, राजस्थानमधील जयपूरला कारखान्यात काम करण्यासाठी आले होते आणि जसला गावातील झोपडपट्टीत राहत होते. कुटूंबातील महिला स्वयंपाकघरात काम करत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. घराला आग लागल्यानंतर त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांसह कुटुंबातील सर्व सदस्य आगीत सापडले, यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला असे एसएचओ राजेंद्र शर्मा यांनी सांगितले. पुढे बोलताना शर्मा म्हणाले, “मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी एफएसएल पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे” .
“जयपूरमधील विश्वकर्मा येथे लागलेल्या भीषण आगीमुळे ५ नागरिकांचा अकाली मृत्यू झाल्याची ही हृदयद्रावक घटना आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि कुटुंबीयांना दु:ख् सहन करण्याची शक्ती मिळो आणि जखमी लवकरात लवकर बरे होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जखमींना योग्य उपचार सुविधा देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 : बड्यांच्या मांडवात वाजंत्र्यांची मांदियाळी!; राज्यात 145 नोंदणीकृत राजकीय पक्ष
Italy PM Giorgia Meloni Deepfake Video : इटलीच्या पंतप्रधानांचा डीपफेक पोर्न व्हिडिओ, मेलोनी यांनी मागितली १ लाख युरोची नुकसान भरपाई
Lok Sabha 2024 : विदर्भातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार! पटोले, वडेट्टीवार, ठाकरे, राऊत यांना लढण्याचे हायकमांडचे आदेश 
Allahabad High Court : जातीवर आधारित रॅलींवर बंदी येणार? अलाहाबाद हायकोर्टाची भाजप, काँग्रेसला नोटीस

The post सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source