
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्सचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने मुंबई इंडियन्समध्ये सुरू असलेल्या कर्णधारपदाच्या वादावर वक्तव्य केले आहे. 2013 ते 2023 या दहा वर्षाच्या कालावधीत रोहितने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली. कर्णधा पदाच्या कारकिर्दीत त्याने संघाला पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावून दिले; परंतु, यंदाच्या हंगामात त्याला कर्णधारपदापासून दूर करत कर्णधारपदाची माळ हार्दिक पंड्याच्या गळ्यात घातली. मुंबईच्या निर्णयामुळे संघाचे चाहते नाराज आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर हार्दिकच्या कर्णधार पदावरून अनेक वाद व्हायरल होत आहेत. यावर आता हरभजन सिंगने विधान केले आहे. जाणून घेवूयात त्याबद्दल… (IPL 2024)
आयपीएल 2024 हंगमात रोहित शर्मा 2013 नंतर प्रथमच दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. फ्रँचायझीने रोहितला हटवून हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. IPL 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिकची मुंबईने गुजरात टायटन्सला खरेदी केली होती. तेव्हापासून रोहित आणि त्याच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती. आता हरभजनने रोहित आणि हार्दिक यांच्यातील समीकरणावर आपले मत मांडले आहे.
हरभजन म्हणाला वेळचं ठरवेल…
हरभजनसिंग एका मुलाखतीत म्हणाला की, ‘येथे कोण आनंदी आहे आणि कोण नाही हे येणारा काळच सांगेल. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील एक मजबूत आणि बलाढ्य संघ आहे. मला खात्री आहे की, त्यांना वाद मागे सोडून भविष्यासाठी काही उपाय शोधायला आवडेल. एमएस धोनीसह रोहित हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने MI ला पाच जेतेपदे (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) मिळवून दिली आहेत.
दुसरीकडे, हार्दिकने 2022 मध्ये त्याच्या पदार्पणाच्या हंगामात GT चे नेतृत्व करून IPL जिंकले. IPL 2023 मध्ये गुजरातला चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) पराभवाला सामोरे जावे लागले होते. अलीकडेच एका कार्यक्रमात हार्दिकला विचारण्यात आले की, रोहितसोबत नेतृत्व बदलाबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली का? तर त्याने उत्तर दिले की, रोहित दौऱ्यावर असल्यामुळे मला त्याच्याशी बोलायला मिळाले नाही. जेव्हा तो संघात सामील होईल तेव्हा मी त्याच्याशी नक्कीच बोलेन. (IPL 2024)
रोहित माझा मार्गदर्शक
आगामी मोसमात रोहित नक्कीच माझा मार्गदर्शक बनेल, असे हार्दिकने या पूर्वी म्हटलं आहे. कर्णधारपदाच्या वादामुळे आम्ही वेगळे होणार नाही. मैदानावर जेव्हा-जेव्हा मला त्याची मदत लागेल तेव्हा मी त्याच्याकडे जाईन. आजपर्यंत रोहितने संघासाठी केले आहे ते मला पुढे न्यायचे आहे.
“Only Time Will Tell Who Will Be Comfortable, Who Will Not”: Harbhajan Singh On Mumbai Indians Captaincy Row#MumbaiIndians #RohitSharma #HardikPandya https://t.co/s3tzcHvDF3 pic.twitter.com/jTL2ginjbM
— CricketNDTV (@CricketNDTV) March 21, 2024
हेही वाचा :
Congress : कॉंग्रेसला आर्थिकदृष्ट्या अपंग बनवण्याचा प्रयत्न; सोनिया गांधीचा भाजपवर हल्लाबोल
Beggar News : तर मग ठरवा! आजपासून पैशांची भीक देणार नाही
नाशिक : स्थानिकांचा रोजगार ठप्प करत दुकाने बंद ठेवून परप्रातीयांनी केली हेकेखोरी
Latest Marathi News मुंबई कर्णधार पदाच्या ‘वादा’वर मुंबईचा माजी खेळाडू म्हणाला, “वेळचं ठरवेल…” Brought to You By : Bharat Live News Media.
