गेल्या दशकभराचा काळ विक्रमी उष्णतेचा!

वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढ, हवामान बदल ही समस्या गेल्या कैक वर्षांपासून संपूर्ण जगाची चिंता वाढवत आहे. अशा या समस्येशी दोन हात करण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक संघटना काम करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक असणार्‍या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने नुकतीच एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, साधारणत: मागील दशकभराचा काळ जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडणारा … The post गेल्या दशकभराचा काळ विक्रमी उष्णतेचा! appeared first on पुढारी.

गेल्या दशकभराचा काळ विक्रमी उष्णतेचा!

वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढ, हवामान बदल ही समस्या गेल्या कैक वर्षांपासून संपूर्ण जगाची चिंता वाढवत आहे. अशा या समस्येशी दोन हात करण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक संघटना काम करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक असणार्‍या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने नुकतीच एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, साधारणत: मागील दशकभराचा काळ जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडणारा ठरला आहे.
2014 ते 2023 या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये पृथ्वीच्या तापमानात सरासरी मोठ्या फरकाने वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आधुनिकतेच्या साथीने अतिशय वेगात प्रवास करणार्‍या या जगासाठी कार्बन उत्सर्जन ही एक मोठी समस्या ठरत असून, त्याचा थेट धोका मानवी अस्तित्वाला असल्याची बाब आता सातत्याने समोर येत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागीत दहा वर्षांचा काळ हा आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण काळ ठरला आहे. मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या हवामान विभागाच्या वतीने वार्षिक हवामान अहवाल सादर करण्यात आला.
ज्यामध्ये 2023 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष राहिल्याची नोंद करण्यात आली. गेल्या 10 वर्षांच्या काळात तापमानवाढीचे थेट परिणाम महासागरांवरही झाले. इतकेच नव्हे, तर मोठ मोठे हिमनगरही त्यामुळे वितळण्यास सुरुवात झाल्याची धास्तावणारी माहिती या अहवालातून समोर आली. त्यामधील माहितीनुसार, 2023 मध्ये पृथ्वीच्या पृष्ठाचे सरासरी तापमान 1.45 अंशांनी अधिक असल्याची नोंद झाली. औद्योगिकीकरणापूर्वीच्या अर्थात 1850 ते 1900 दरम्यानच्या काळाच्या तुलनेत हे तापमान लक्षणीयरीत्या अधिक असून, 2016 नंतर सध्याच्या तापमानामध्ये साधारणत: 1.29 अंश इतक्या फरकाची नोंद करण्यात आली आहे.
जागतिक हवामान संघटनेच्या वरील अहवालावर संयुक्त राष्ट्र संघटनेचे प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांनीही चिंता व्यक्त केली. अहवालातील माहिती आणि एकंदर आकडेवारी पाहता, पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. ‘पृथ्वी संकेत देत असून, सध्या इंधनाच्या वापरामुळे होणार्‍या प्रदूषणाची पातळी पाहता निसर्गाला त्यामुळे किती इजा पोहोचत आहे ही बाब लक्षणीयरीत्या समोर आली आहे.’ असे ते म्हणाले. जागतिक हवामान संघटनेच्या प्रमुखपदी असणार्‍या एंड्रिया सेलेस्टे साउलो यांनी या अहवालाकडे संपूर्ण जगानेधोक्याचा इशारा म्हणून पाहणे गरजेचे असून, महासागरांच्या पृष्ठाचे तापमान वाढणे, ग्लेशिअर वितळणे या सर्व गोष्टी चिंता वाढवणार्‍या असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
Latest Marathi News गेल्या दशकभराचा काळ विक्रमी उष्णतेचा! Brought to You By : Bharat Live News Media.