टीम ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचा खेळाडू! कोण आहे तन्‍वीर संघा?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ च्या फायनलनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिकेला आजपासून (दि.23) सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांचे संघ जाहीर झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघात भारतीय वंशाच्या खेळाडूचाही समावेश आहे. हा खेळाडू 22 वर्षीय तन्‍वीर संघा आहे. जो … The post टीम ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचा खेळाडू! कोण आहे तन्‍वीर संघा? appeared first on पुढारी.
#image_title

टीम ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचा खेळाडू! कोण आहे तन्‍वीर संघा?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ च्या फायनलनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिकेला आजपासून (दि.23) सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांचे संघ जाहीर झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघात भारतीय वंशाच्या खेळाडूचाही समावेश आहे. हा खेळाडू 22 वर्षीय तन्‍वीर संघा आहे. जो पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आला आहे. काय आहे त्यांची कहाणी, जाणून घेऊया… (Tanveer Sangha)
कोण आहे तन्‍वीर संघा ?
तन्‍वीर संघाचा जन्म ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरात झाला. त्याचे वडील जोगा संघा हे मुळेच पंजाबमधील रहीमपूर  गावातील रहिवासी आहेत. मात्र, 26 वर्षांपूर्वी (1997) ते भारत सोडून ऑस्ट्रेलियाला गेले. येते त्‍यांनी टॅक्सी चालकाचे काम केले. (Tanveer Sangha). तन्‍वीरच्‍या आईचे नाव उपनीत आहे. त्या व्यवसायाने अकाउंटंट आहेत. तनवीर संघाने भारताला अनेकदा भेट दिली आहे. त्यांच्‍या वडिलांचे कुटुंब भारतात राहते. मात्र तन्‍वीर हा आपल्‍या आई-वडिलांसमवेत ऑस्‍ट्रेलियात राहताे.
तन्वीरचे ऑस्ट्रेलिया संघात यावर्षी केले पदार्पण
तन्‍वीरने  या वर्षी ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आतापर्यंत त्याने कांगारू संघासाठी 2 वनडे आणि 2 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकदिवसीय सामन्यात 2 विकेट घेतल्या आहेत.  T20 मध्ये त्याने 5 विकेट घेतल्या आहेत. भारतीय फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर तनवीर प्रभावी ठरू शकतो. त्याची फिरकी गोलंदाजी युवा टीम इंडियाला अडचणीत आणू शकताे.
ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा दुसरा भारतीय
तन्‍वीर संघापूर्वी आणखी एका भारतीयाने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. गुरिंदर सिंग संधू असे त्याचे नाव आहे.

Get. Set. GO 💥
T20I Mode 🔛#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/n4Watr5K4o
— BCCI (@BCCI) November 23, 2023

हेही वाचा :

Weather Forecast | आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता
रायगड : विस्तारीत शहापूर औद्योगिक क्षेत्रातील मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; पोलिसांची दडपशाही, २० जणांना घेतले ताब्यात
अचानक लागलेल्या आगीत बस खाक ; सर्व प्रवासी सुखरूप

The post टीम ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचा खेळाडू! कोण आहे तन्‍वीर संघा? appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ च्या फायनलनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिकेला आजपासून (दि.23) सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांचे संघ जाहीर झाले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघात भारतीय वंशाच्या खेळाडूचाही समावेश आहे. हा खेळाडू 22 वर्षीय तन्‍वीर संघा आहे. जो …

The post टीम ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचा खेळाडू! कोण आहे तन्‍वीर संघा? appeared first on पुढारी.

Go to Source