
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्ली मद्य प्रकरणी अटक होणार नसले तसेच कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नसेल तरच आपण सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) करण्यात येणार्या चौकशीला हजर राहू, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात नव्याने दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे. आज त्यांच्या या याचिकेवर न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ‘ईडी’ने केजरीवाल यांना आतापर्यंत नऊ समन्स बजावले आहेत. आज ( दि.२१ मार्च) केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांच्या वतीने युक्तीवाद करताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही ईडीने अशाच प्रकारे अटक केली होती.ईडी अटक करेल, अशी भीती वाटत असून अटकेपासून संरक्षण दिल्यास केजरीवाल ईडी चौकशीला हजर राहण्यास तयार आहेत.
दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने दिल्ली उच्च न्यायालय में एक नई याचिका दायर कर अपने खिलाफ कोई दंडात्मक कार्रवाई नहीं करने की मांग की है।
न्यायमूर्ति सुरेश कुमार कैत की अगुवाई वाली खंडपीठ आज सुबह मामले की सुनवाई करेगी।
एक्साइज मामले में ED अब तक उन्हें 9 समन जारी कर चुकी… pic.twitter.com/WH5kQEGnai
— ANI_HindiNews (@AHindinews) March 21, 2024
The post अटक होणार नसेल तरच ‘ईडी’समोर हजर राहणार : केजरीवालांची नवी याचिका appeared first on Bharat Live News Media.
