अमेरिकेतून आली पॉझिटिव्ह बातमी, सेन्सेक्स ५५० अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांनी क्षणात कमावले ४.३२ लाख कोटी

Bharat Live News Media ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे जूनमध्ये व्याजदर कपातीची आशा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि.२१) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५५० हून अधिक अंकांनी वाढून ७२,६८० वर पोहोचला. तर निफ्टीने २२ हजारांवर व्यवहार सुरु केला आहे. आयटी, मेटल सरकारी बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून येत आहे. एकूणच सर्वच क्षेत्रात चौफेर खरेदी सुरु आहे.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, सुरुवातीच्या तेजीमुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.३२ लाख कोटी रुपयांनी वाढून ३७८.४४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
सेन्सेक्सवर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, विप्रो, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर मारुती, नेस्ले शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली आहे. (Stock Market Updates)
निफ्टीवर बीपीसीएल, टाटा स्टील, हिंदाल्को, एनटीपीसी, इंडसइंड बँक हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर अपोलो हॉस्पिटल, मारुती, नेस्ले इंडिया, हिरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डी या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.
यूएस फेडने अपेक्षेप्रमाणे ५.२५ टक्के आणि ५.५ टक्क्यांदरम्यान व्याजदर कायम ठेवला आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही. याचे शेअर बाजारात सकारात्मक पडसाद दिसून येत आहे. या वर्षी तीन व्याजदर कपातीच्या फेडच्या अंदाजानंतर, LTTS, Coforge, Wipro आणि HCL Tech यांच्या नेतृत्वाखाली निफ्टी IT ने सुमारे १ टक्क्याने उसळी घेतली.
आयटी शेअर्समधील तेजीमुळे गुरुवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीही वाढले. यूएस फेडरल रिझर्व्हने या वर्षी तीन दर कपातीचा अंदाज कायम ठेवल्यानंतर जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत.
Latest Marathi News अमेरिकेतून आली पॉझिटिव्ह बातमी, सेन्सेक्स ५५० अंकांनी वाढला, गुंतवणूकदारांनी क्षणात कमावले ४.३२ लाख कोटी Brought to You By : Bharat Live News Media.
