उद्धव ठाकरे आज शाहू महाराज यांना भेटणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार म्हणून शाहू महाराज यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे आणि शाहू महाराज यांच्यात होणारी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. … The post उद्धव ठाकरे आज शाहू महाराज यांना भेटणार appeared first on पुढारी.

उद्धव ठाकरे आज शाहू महाराज यांना भेटणार

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार म्हणून शाहू महाराज यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे आणि शाहू महाराज यांच्यात होणारी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून शाहू महाराज यांचे नाव निश्चित झाले आहे. त्याला आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी पाठिंबा दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्याने कोल्हापूरसाठी ठाकरे यांनी या जागेवर दावा सांगितला होता. मात्र, शिवसेनेतून निवडून आलेले संजय मंडलिक राज्यातील सत्तासंघर्षातील नाट्यात शिंदे गटात सहभागी झाले. ठाकरे गटाची साथ सोडलेल्या मंडलिक यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचा चंग, शिवसेनेच्या ठाकरे गटाने बांधला आहे. यामुळे शाहू महाराज यांच्या नावाला पसंती देत, ही जागा शिवसेनेने काँग्रेसला दिली आहे.
कोल्हापूरच्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी प्रारंभीपासून समन्वयाची भूमिका ठेवली आहे. यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात आतापर्यंत एकत्रित काम करताना दिसत आहे. एकसंधपणे आणि ताकदीने कोल्हापूरची निवडणूक लढवण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गुरुवारी शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या प्रचाराला आणखी वेग येईल, असे सांगण्यात आले.
मुंबईहून दुपारी साडेचार वाजता ठाकरे यांचे विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते न्यू पॅलेस येथे जाऊन शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर ठाकरे मिरजला रवाना होतील. मिरज येथून रात्री उशिरा ते कोल्हापूर विमानतळावरून मुंबईला रवाना होणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आदींसह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Latest Marathi News उद्धव ठाकरे आज शाहू महाराज यांना भेटणार Brought to You By : Bharat Live News Media.