मानवत : वझुर खु. येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल
मानवत; Bharat Live News Media वृत्तसेवा : मानवत तालुक्यातील वझुर खु. येथील २१ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी माहेरच्या व्यक्तींपैकी पतीसह सासुवर मानवत पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. 20) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. मयत विवाहितेचे नाव प्रतीक्षा वशिष्ठ शिंदे (वय २२) असून ती तालुक्यातील वझुर खुर्द येथे राहत होती.
याबाबत माहिती अशी की , वझुर खु येथे घरी कोणीही नसतांना प्रतीक्षा शिंदे हिने राहत्या घरी सकाळी १० ते दुपारी १२ च्या सुमारास गळफास घेऊन संपवल्याची घटना घडली. पती वशिष्ठ शिंदे याने घरी आल्यावर सदरील घटना दिसून आली . पतीने व इतर गावातील नागरिकांनी मानवतच्या त्वरित पुढील उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात सदरील विवाहितेला आणले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले . त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने मोठा गोंधळ उडाला .
मृत विवाहिता ही परभणी तालुक्यातील मांडाखळी येथील भगवान जोध यांची कन्या होती. अडीच वर्षांपूर्वी प्रतीक्षाचा विवाह मानवत तालुक्यातील वझुर खु. येथील वशिष्ठ शिंदे यांच्याशी २०२१ मध्ये झाला. त्यांना दोन वर्षाची एक मुलगी आहे. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ओव्हळ , पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी रुग्णालयात धाव घेतली. प्रकरणाची चौकशी करून नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करू अशी समज दिली परंतु मांडाखळी येथील नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी रात्री ९ च्या सुमारास विवाहितेचा पती वशिष्ठ शिंदे व सासू सुवर्णमाला शिंदे या दोघांविरुद्ध विवाहितेला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Latest Marathi News मानवत : वझुर खु. येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.