नागपूर : मौजा रुई परिसरात आढळला मृतावस्थेत वाघ, वन्यप्रेमींच्या संतापजनक प्रतिक्रिया

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर वन विभागातील मौजा रुई गावाच्या परिसरात जागतिक वन दिनाच्या पूर्वसंध्येला एक वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बातमीनंतर वन्यप्रेमींकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. विस्तृत माहिती अशी की, सेमिनरी हिल्स वन परिक्षेत्रातील मौजा रुई गावाच्या परिसरात दिनांक 20 मार्च रोजी वाघ मृत अवस्थेत पडून असल्याची वन विभागाला माहिती … The post नागपूर : मौजा रुई परिसरात आढळला मृतावस्थेत वाघ, वन्यप्रेमींच्या संतापजनक प्रतिक्रिया appeared first on पुढारी.

नागपूर : मौजा रुई परिसरात आढळला मृतावस्थेत वाघ, वन्यप्रेमींच्या संतापजनक प्रतिक्रिया

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर वन विभागातील मौजा रुई गावाच्या परिसरात जागतिक वन दिनाच्या पूर्वसंध्येला एक वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बातमीनंतर वन्यप्रेमींकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
विस्तृत माहिती अशी की, सेमिनरी हिल्स वन परिक्षेत्रातील मौजा रुई गावाच्या परिसरात दिनांक 20 मार्च रोजी वाघ मृत अवस्थेत पडून असल्याची वन विभागाला माहिती मिळताच तात्काळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळाची पाहणी केली असता कोणत्याही अवैध प्रकारे वाघाची शिकार केली असावी असे निदर्शनास आढळून आले नाही. मृत वाघाचे संपूर्ण अवयव शाबूत असून पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उत्तरीय तपासणीवरून सदर वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज दर्शविण्यात आला. सदर मृत वाघाचे राष्ट्रीय वाघ प्राधिकरण NTCA यांच्या कार्यभुत प्रलानिनुसार शवविछेदन करण्यात आले.
सदरची कार्यवाही भारतसिंघ हाडा यांच्या मार्गर्शनाखाली मनोज धनविजय सहायक वनसंरक्षक उमरेड, विजय गंगावणे सहायक वनसंरक्षक नागपूर, सौ. सारिका वैरागडे वन परिक्षेत्र अधिकारी सेमिनरी हिल्स नागपूर, प्रमोद वाडे वन परिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, पशू वैद्यकीय अधिकारी, NTCA चे प्रतिनिधी अनिल दशहरे, प्रधान मुख्यवनसंरक्षक वन्यजीव यांचे प्रतिनिधी अजिंक्य भटकर, मानद वन्यजीव रक्षक, सातपुडा संस्थेचे मंदार पिंगळे, वनपाल रमधम यांनी केली.
Latest Marathi News नागपूर : मौजा रुई परिसरात आढळला मृतावस्थेत वाघ, वन्यप्रेमींच्या संतापजनक प्रतिक्रिया Brought to You By : Bharat Live News Media.