धाराशिव : राष्ट्रीय महामार्गावरील धाकटीवाडी येथील पुलाखाली आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

उमरगा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग ६५ वर धाकटीवाडी शिवारातील पुलाखाली अंदाजे एका ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी (दि १७) सहाच्या सुमारास उघडकीस आली होती. या घटनेला चार दिवस लोटले तरी अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही, त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान मृत व्यक्तीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शितगृहात ठेवण्यात … The post धाराशिव : राष्ट्रीय महामार्गावरील धाकटीवाडी येथील पुलाखाली आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह appeared first on पुढारी.

धाराशिव : राष्ट्रीय महामार्गावरील धाकटीवाडी येथील पुलाखाली आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

उमरगा; Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग ६५ वर धाकटीवाडी शिवारातील पुलाखाली अंदाजे एका ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना रविवारी (दि १७) सहाच्या सुमारास उघडकीस आली होती. या घटनेला चार दिवस लोटले तरी अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही, त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान मृत व्यक्तीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातील शितगृहात ठेवण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील धाकटीवाडी शिवारातील पुलाखाली अंदाजे एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक डि बी पारेकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पी आर तायवाडे बीट अंमलदार पोहेकॉ बालाजी कामतकर, पोलिस शिपाई औदुबर गजभार यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
मृत व्यक्तीचे वर्णन
 मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष असून सडपातळ बांधा, उंची १६५ सेमी, अंडाकृती चेहरा, रंग काळा सावळा व अंगात चॉकलेटी रंगाचा लांब बाह्या असलेला रेडीमेड शर्ट, फिकट पांढऱ्या रंगाची कॉटन जिन्स पॅन्ट, पायात काळसर रंगाची चामड्याची चप्पल अशा वर्णनाची व्यक्ती मृतावस्थेत दिसून आली.
याबाबत पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळ व आजूबाजूचा संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश आले नाही. दरम्यान धाराशिव येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली. मात्र श्वान घटनास्थळावरच घुटमळले. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर ओळख पटविण्यासाठी मृतदेह शितगृहात ठेवण्यात आला आहे. चार दिवस झाले तरी मृत देहाची ओळख पटविण्यात यश आले नाही. त्यामुळे दिवसें दिवस गुढ वाढत चालले असून पोलीसासमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. दरम्यान धाकडीवाडीचे पोलिस पाटील मारुती सास्तुरे यांनी दिलेल्या माहितीवरुन उमरगा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पी आर तायवाडे हे करीत आहेत.
Latest Marathi News धाराशिव : राष्ट्रीय महामार्गावरील धाकटीवाडी येथील पुलाखाली आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह Brought to You By : Bharat Live News Media.