काका पोलिस असल्याचे सांगताच मुलीला सोडलं, दुचाकीस्वारांचा अपहरणाचा प्रयत्न फसला

जळगाव : धरणगाव शहरातील 14 वर्षे वय असलेल्या अल्पवयीन मुलीचे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धरणगाव शहरात असलेल्या चिंतामण मोरया नगर परिसरामध्ये इयत्ता नववीचे शिक्षण घेणारी 14 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह राहत आहे. नेहमीप्रमाणे (दि. 19) सकाळी सात वाजता ती क्लासला गेली होती. क्लास 10 वाजता सुटल्यानंतर घरी येत असताना धरणगाव शहरातील गांधी मळा येथे विना क्रमांकच्या पल्सर गाडीवरून 2 व्यक्ती तोंडावर रुमाल बांधलेले आले. त्यांनी पीडित मुलीला पत्ता विचारण्याचा बहाणा करुन मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून दुचाकी वर बळजबरीने बसवले. तिचे दप्तर फेकून दिले. दरम्यान, पीडित मुलीने माझे काका पोलीस असल्याचे सांगितल्यावर दोघा अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज कमानीजवळ तिला खाली उतरून दिले. व ते दोघेही जळगावच्या दिशेने पसार झाले.
दरम्यान पीडित मुलगी ही पळत धरणगाव रेल्वे स्टेशनच्या रेल्वे कॉटर्स जवळ आली. पिडीत मुलीने हा प्रकार तिचे काका आणि नातेवाईकांना सांगितला. पीडित मुलीसह तिचे काका यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून मंगळवारी (दि. १९) रात्री ८ वाजता अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सपोनि जीभाऊ पाटील हे करीत आहे.
हेही वाचा –
Swatantrya Veer Savarkar : अंकिता लोखंडे-रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट लवकरच भेटीला
‘काँस्टेबल मंजू’ मध्ये अभिनेत्री विद्या सावळे तिच्या जुळ्या मुलींसह
Latest Marathi News काका पोलिस असल्याचे सांगताच मुलीला सोडलं, दुचाकीस्वारांचा अपहरणाचा प्रयत्न फसला Brought to You By : Bharat Live News Media.
