लाटीपाडा धरणात 57 वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील 57 वर्षीय माध्यमिक शिक्षकाचा लाटीपाडा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. महेंद्र रामदास घरटे (वय 57,रा.स्वामी समर्थनगर,पिंपळनेर)असे मृत शिक्षकाचे नाव आहे. देशशिरवाडे येथील नूतन माध्यमिक विद्यालयात कार्यरत महेंद्र घरटे सकाळी दहाच्या सुमारास दुचाकी (एमएच 18, बीके 3793) ने सुकापूर येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून कामावर निघाले. … The post लाटीपाडा धरणात 57 वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

लाटीपाडा धरणात 57 वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू

पिंपळनेर: (जि.धुळे) Bharat Live News Media वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील 57 वर्षीय माध्यमिक शिक्षकाचा लाटीपाडा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. महेंद्र रामदास घरटे (वय 57,रा.स्वामी समर्थनगर,पिंपळनेर)असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
देशशिरवाडे येथील नूतन माध्यमिक विद्यालयात कार्यरत महेंद्र घरटे सकाळी दहाच्या सुमारास दुचाकी (एमएच 18, बीके 3793) ने सुकापूर येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून कामावर निघाले. सुकापूर रस्तालगतच्या लाटीपाडा धरणाच्या काही अंतरावर दुचाकी उभी करून ते धरणाच्या पाण्यात उतरल्याचे मासेमारी करणाऱ्यांनी पाहिले. नंतर ते दिसून आले नाहीत. घटनेची माहिती कळताच नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महेंद्र घरटे यांना पाण्यातून बाहेर काढून पिंपळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश मोहने यांनी तपासून मृत घोषित केले. गोविंद रामराव साळुंखे (रा.नेर,ता.धुळे,ह.मु.स्वामी समर्थनगर पिंपळनेर)
यांच्या माहितीवरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा –

Loksabha Election 2024 : ‘गर्दी’च्‍या मनात नेमकं काय? निकालापर्यंत प्रश्न अनुत्तरीतच राहतो
Lok Sabha Election 2024 : नागपूरातून व्यंकटेश्वर स्वामी महाराजांनी भरला पहिला उमेदवारी अर्ज
Lok Sabha Election 2024 : माढ्याची बंडाळी फडणवीसांच्या कोर्टात; अजितदादांचीही मध्यस्थी

Latest Marathi News लाटीपाडा धरणात 57 वर्षीय शिक्षकाचा बुडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.