
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनयाचे बाळकडू जेव्हा घरातूनच मिळतं तेव्हा आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवून कलाकारांची मुलं अभिनयाकडे वळतात. लहानपणापासून आपल्या कलाकार आई-वडिलांमध्ये पाहिलेले अभिनय कौशल्य, सोबतीला त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे मुलांना त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात एक आत्मविश्वास मिळतो. असाच एक प्रवास सुरू झाला आहे कलाकार मायलेकींचा. कलाकार आई आणि तिच्या दोन जुळ्या मुली अशी ही माय लेकींची जोडी पाहायला मिळत आहे.
‘सन मराठी’वर ‘काँस्टेबल मंजू’ ही नवीन मालिका येत्या १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या मालिकेत अभिनेत्री विद्या सावळे आणि त्यांच्या जुळ्या मुली नेहा आणि निकिता ‘मम्मीसाहेब’ आणि ‘सवी- कवी’ या भूमिका साकारणार आहेत. आई आणि तिच्या जुळ्या मुली यांना छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्याचा योग जुळवून आणला आहे.
संदीप जाधव निर्मित ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले आहे. स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे.
Latest Marathi News ‘काँस्टेबल मंजू’ मध्ये अभिनेत्री विद्या सावळे तिच्या जुळ्या मुलींसह Brought to You By : Bharat Live News Media.
