IPL मध्ये कोणत्या संघाने सर्वाधिक सामने गमावले? जाणून घ्या आकडेवारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 22 मार्चला सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्याने या लीगची सुरुवात होईल. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने गमावलेल्या संघांबद्दल जाणून घेऊया. दिल्ली कॅपिटल्स (IPL 2024 Delhi Capitals) आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने सर्वाधिक सामने गमावले आहेत. या संघाने एकूण 238 सामने खेळले असून त्यापैकी … The post IPL मध्ये कोणत्या संघाने सर्वाधिक सामने गमावले? जाणून घ्या आकडेवारी appeared first on पुढारी.

IPL मध्ये कोणत्या संघाने सर्वाधिक सामने गमावले? जाणून घ्या आकडेवारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 22 मार्चला सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्याने या लीगची सुरुवात होईल. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने गमावलेल्या संघांबद्दल जाणून घेऊया.
दिल्ली कॅपिटल्स (IPL 2024 Delhi Capitals)
आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने सर्वाधिक सामने गमावले आहेत. या संघाने एकूण 238 सामने खेळले असून त्यापैकी 127 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सने अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही.

पंजाब किंग्ज (IPL 2024 Punjab Kings)
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने गमावण्याच्या बाबतीत पंजाब किंग्ज संघ दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने 232 सामने खेळले आहेत, त्यापैकी 124 सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. पंजाब किंग्जनेही अद्याप आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही.

रॉयल चँलेंजर बेंगलुरू (IPL 2024 Royal Challengers Bengaluru)
स्टार फलंदाज विराट कोहलीचा संघ रॉयल चँलेंजर बेंगलोर पराभवाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीबी संघाने 241 पैकी 120 सामने गमावले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)
कोलकाता नाईट रायडर्स संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने गमावण्याच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. या संघाने 237 सामने खेळले असून त्यापैकी 119 सामने जिंकले आहेत, तर 114 गमावले आहेत.

मुंबई इंडियन्स (IPL 2024 Mumbai Indians)
मुंबई इंडियन्स संघाने पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. पण एकूण सामने गमावण्याच्या बाबतीत हा संघ पाचव्या स्थानावर आहे. या संघाने 247 सामने खेळले असून त्यापैकी 105 मध्ये एमआयचा पराभव झाला आहे.

अधिक वाचा :

BCCI Selection Committee : टी-20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवा ‘सिलेक्टर’! ‘या’ तीन दिग्गजांनी केले अर्ज
IPL 2024 CSK : सीएसकेसाठी धोनी मारणार विजेतेपदाचा ‘षटकार’?
SRS in IPL : आयपीएलमध्ये डीआरएस ऐवजी आता एसआरएस!

Latest Marathi News IPL मध्ये कोणत्या संघाने सर्वाधिक सामने गमावले? जाणून घ्या आकडेवारी Brought to You By : Bharat Live News Media.