काँग्रेस घेतेय विकास ठाकरे यांचा राजकीय बळी : धर्मपाल मेश्राम

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर लोकसभा निवडणुकीत एकीकडे भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली असून ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसमधून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना नागपूरातुन उमेदवारी म्हणजे, त्यांचा राजकीय बळीच प्रकार असल्याचा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.
संबंधित बातम्या
Zilla Parishad CEO Transfer News | आता जळगाव जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ शुभम गुप्ता
अधिसूचना जाहीर होताच प्रशासन इलेक्शन मोडवर, जिल्हा सीमांवर तपासणी सूरु
नवरी मिळे हिटलरला : खऱ्या गोविंदा पथकासोबत लीलाला फोडायची होती दहीहंडी, वल्लरीने सांगितला ‘तो’ किस्सा
नितीन गडकरी यांनी नागपूरात मेट्रो, मिहान, एम्स असे सर्वांगीण क्षेत्रात एवढे काम केले आहे की, ज्यामुळे एकतर त्यांच्या विरोधात लढायला कुणी तयार नाहीत, आता नेत्यांनी आपल्या सोयीसाठी विकास ठाकरे यांना उभे केले तरी नक्की त्यांचा मोठा पराभव होणार आहे. शहरातील सहाही मतदारसंघात भाजपला मोठी लीड मिळेल आणि त्याचा प्रभाव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पण पडणार असल्याचा दावा मेश्राम यांनी केला.
Latest Marathi News काँग्रेस घेतेय विकास ठाकरे यांचा राजकीय बळी : धर्मपाल मेश्राम Brought to You By : Bharat Live News Media.
