नागपूर : नामनिर्देशनपत्र दाखल करताना 3 वाहने, 5 व्यक्तींना प्रवेश

नागपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल करण्यास येणाऱ्या उमेदवारांना तीन वाहने आणि पाच व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी व्यवस्था पाहणी केली. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी याबाबतीत आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात येणाऱ्या वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा नसावा. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात, तसेच दालनात प्रवेश दिला जाणार नाही.
निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंडविधान 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील.
हेही वाचा :
Priyanka Chopra : जय श्रीराम! प्रियांका चोप्रा, निक जोनास सहकुटुंब अयोध्येत, प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन
UPSC Prelims : ‘यूपीएससी’ची प्रिलिम्स पुढे ढकलली; जाणून घ्या नवीन तारीख
सिद्धू मुसेवालाच्या आईवरील IVF उपचाराबाबत आराेग्य मंत्रालयाची पंजाब सरकारला नोटीस
Latest Marathi News नागपूर : नामनिर्देशनपत्र दाखल करताना 3 वाहने, 5 व्यक्तींना प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.
