कराळे मास्‍तर वर्ध्यातून लोकसभेसाठी इच्छुक; पवारांची घेतली भेट

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा वर्धा लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलो होतो अशी महिती आपल्या अफलातून शैलीत युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारे नितेश कराळे मास्तर यांनी दिली. मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून चर्चा केली. पक्षश्रेष्ठी ठरवतील जागा द्यायची की नाही, कारण जनतेचे गोरगरिब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे असे … The post कराळे मास्‍तर वर्ध्यातून लोकसभेसाठी इच्छुक; पवारांची घेतली भेट appeared first on पुढारी.

कराळे मास्‍तर वर्ध्यातून लोकसभेसाठी इच्छुक; पवारांची घेतली भेट

नागपूर : Bharat Live News Media वृत्‍तसेवा वर्धा लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलो होतो अशी महिती आपल्या अफलातून शैलीत युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारे नितेश कराळे मास्तर यांनी दिली.
मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून चर्चा केली. पक्षश्रेष्ठी ठरवतील जागा द्यायची की नाही, कारण जनतेचे गोरगरिब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे असे खूप काही प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन मी मुंबईत चर्चेसाठी आलो होतो. विधानपरिषद निवडणूकीत चांगली मते घेऊन ताकद दाखवली होती, मी चांगली लढत देऊ शकतो, म्हणून मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे.
वर्ध्याचे विद्यमान खासदार रामदास तडस हे संथगतीने काम करत आहेत. मी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो पण तिकडे माझी भेट झाली नाही. शरद पवार साहेब वेळेवर मला भेटले. त्यांनी माझे सगळे प्रश्न किंवा माझं म्हणणं ऐकलं मात्र अद्याप उमेदवारी कन्फर्म झालेली नाही असेही कराळे गुरुजींनी स्पष्ट केले.
हेही वाचा :

सिद्धू मुसेवालाच्‍या आईवरील IVF उपचाराबाबत आराेग्‍य मंत्रालयाची पंजाब सरकारला नोटीस 
Hiraman Khoskar | कॉंग्रेस आमदार खोसकरांची ‘सिल्व्हर ओक’ वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती

पहाटेचा शपथविधी ठरवून, मला बदनाम केले : अजित पवारांचे शरद पवारांवर टीकास्त्र

Latest Marathi News कराळे मास्‍तर वर्ध्यातून लोकसभेसाठी इच्छुक; पवारांची घेतली भेट Brought to You By : Bharat Live News Media.