
पुणे : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क : सर्व पक्षांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, त्यासाठी स्थानिक पातळीवर उद्भवलेले प्रश्न मार्गी लावणे आवश्य़क असल्याचं भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. महायुतीतील शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधाची भूमिका घेऊन आपण निवडणूकिला उभे राहू अशी भूमिका घेतली आहस. तर आता इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनीही आपली भूमिका मुठीत ठेवली आहे. महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळणं गरजेचं आहे, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जाहीर सभेत आपल्याला धमक्या मिळत आहेत. हे चुकीचं असल्याचं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली. बारामती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दमदाटीची भाषा चुकीची
देवेंद्र फडणवीसांशी चर्चा झाल्यानंतर बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महायुतीमध्ये असलेल्या सर्वच पक्षांनी युतीधर्म पाळणं गरजेचं आहे. पण अस होताना दिसत नाही. अजित पवार गटाचे नेते आपल्याला जाहीर भाषणात धमक्या देतात, दमदाटीची भाषा करतात आणि तेही लोकप्रतिनिधी मंचावर उपस्थित असताना. हे चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टींवर फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली.
बारामतीवर चर्चा झाली. त्यामध्ये आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना काय आहे ते सांगितलं. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी बसवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यामुळे त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करणार. स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्याशी चर्चा करणे आवश्यक असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं. त्यावर आपण यावर योग्य तो तोडगा काढू असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी दिला असल्याचं त्यानी म्हटलं.
हेही वाचा
नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम
सहा वाहने चोरणारे तीन चोरटे अटकेत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधराशे अग्नीशस्त्रे होणार जमा
Latest Marathi News फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची पहिली प्रतिक्रीया; मांडली ‘ही’ भूमिका Brought to You By : Bharat Live News Media.
