हौसेला मोल नाही..! कारला केले ‘हेलिकॉप्टर’; पण पोलीस म्‍हणाले ‘हे’ चालणार नाही…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हौसेला मोल नसते असं म्हणतात. मात्र आपल्‍या कारला हेलिकॉप्‍टरचे रुप देण्‍याची हौस दोन भावांच्‍या चांगलीच महागात पडली आहे. मोटार कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. उत्तर प्रदेशमधील हा प्रकार सध्‍या चर्चेचा विषय ठरला आहे. कारला ‘हेलिकॉप्‍टर’चे रुप देण्‍यासाठी अडीच लाख रुपये खर्च आंबेडकर नगर जिल्‍ह्यातील अकबरपूर तालुक्‍ताील खजुरी … The post हौसेला मोल नाही..! कारला केले ‘हेलिकॉप्टर’; पण पोलीस म्‍हणाले ‘हे’ चालणार नाही… appeared first on पुढारी.
हौसेला मोल नाही..! कारला केले ‘हेलिकॉप्टर’; पण पोलीस म्‍हणाले ‘हे’ चालणार नाही…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : हौसेला मोल नसते असं म्हणतात. मात्र आपल्‍या कारला हेलिकॉप्‍टरचे रुप देण्‍याची हौस दोन भावांच्‍या चांगलीच महागात पडली आहे. मोटार कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. उत्तर प्रदेशमधील हा प्रकार सध्‍या चर्चेचा विषय ठरला आहे.
कारला ‘हेलिकॉप्‍टर’चे रुप देण्‍यासाठी अडीच लाख रुपये खर्च
आंबेडकर नगर जिल्‍ह्यातील अकबरपूर तालुक्‍ताील खजुरी गावात परमेश्वरदीन आणि ईश्वरदीन भाऊ राहतात. लग्न समारंभात वाहने भाड्याने देण्‍याचा त्‍यांचा व्‍यवसाय आहे. नुकतेच त्यांनी कारचे हेलिकॉप्‍टर मॉडेलमध्‍ये रुपांतर करणे सुरु केले. यासाठी अडीच लाख रुपये खर्चही केले. आता ही हेलिकॉप्‍टर कार रंगविण्यासाठी वर्कशॉपमध्ये जात असताना एका वाहतूक पोलिसाने त्‍यांना अडकवले. पोलिसांनी ही कार जप्‍त केली आहे.
वधू-वरांसाठी हेलिकॉप्‍टर कार तयार करण्‍याचे होते नियोजन
वधू-वरांसाठी आणि इतर प्रसंगांसाठी हेलिकॉप्‍टर कार भाड्याने देण्‍यासाठी परमेश्वरदीन आणि ईश्वरदीन यांनी कारला हेलिकॉप्‍टरच्‍या मॉडेलमध्‍ये रुपांतरित केले होते. लग्नाच्या हंगामात या कारला खूप मागणी येईरू, असा त्‍यांचा अंदाज होता.यासाठी त्‍यांनी अडीच लाख रुपये खर्चही केले. अखेर कार रंगविण्‍यापूर्वीच पोलिसांनी ती जप्‍त केली. दोन हजार रुपयांचा दंड ठोठावत कारला जोडण्‍यात आलेला मागील भाग काढून टाकण्‍यासही सांगितले आहे.
आम्‍ही केवळ विवाह समारंभासाठी ही विशेष कार तयार करत होतो. ही कार स्त्यावर धावणारी नव्‍हती. बिहार आणि प्रतापगड सारख्या इतर प्रदेशातही अशीच वाहने कार्यरत असल्याचे दोन्‍ही भावांनी निदर्शनास आणून दिले. दरम्‍यान, आंबेडकर नगरमधील एका पोलिस स्टेशनच्या बाहेर पार्क केलेल्या आणि सोशल मीडियावर अपलोड केलेल्या त्याच्या निर्मितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणाावर व्‍हायरल होते. या व्हिडीओमध्ये बघ्यांची गर्दी आणि काही पोलिस वाहनाभोवती उभे असल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी वाहन जप्त करण्यामागे सुरक्षेच्या कारणास्तव प्राथमिक कारण सांगितले आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत योग्य परवानगीशिवाय कारमध्ये बदल करण्यात आला आहे. कारमध्‍ये बदलांसाठी आरटीओ विभागाची परवानगी आवश्यक आहे, आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 207 अन्वये वाहन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक पोलिस अधीक्षक विशाल पांडे यांनी दिली.

Uttar Pradesh man modifies car into ‘chopper’; police seize vehicle for flouting Motor Act rules
Read @ANI Story | https://t.co/T08UGjJUwU#Ambedkarnagar #UttarPradesh #Helicopter pic.twitter.com/rB8iBE1HJW
— ANI Digital (@ani_digital) March 20, 2024

Latest Marathi News हौसेला मोल नाही..! कारला केले ‘हेलिकॉप्टर’; पण पोलीस म्‍हणाले ‘हे’ चालणार नाही… Brought to You By : Bharat Live News Media.