निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधराशे अग्नीशस्त्रे होणार जमा

अलिबाग ः रमेश कांबळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय अंतर्गत असणार्‍या पंचवीस परवाना असलेली एक हजार 544 शस्त्र परवाना धारक असून त्यांच्याकडे 1हजार 691 शस्त्रे जमा करण्याचा ठरविले असून असून, पुढील काही दिवसांमध्ये शस्त्रे जमा करण्यात येणार आहेत. संबंधित बातम्या  HUL Layoffs | हिंदुस्तान युनिलिव्हरचा मोठा निर्णय, ७,५०० कर्मचाऱ्यांना नारळ, कारण … The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधराशे अग्नीशस्त्रे होणार जमा appeared first on पुढारी.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधराशे अग्नीशस्त्रे होणार जमा

अलिबाग ः रमेश कांबळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय अंतर्गत असणार्‍या पंचवीस परवाना असलेली एक हजार 544 शस्त्र परवाना धारक असून त्यांच्याकडे 1हजार 691 शस्त्रे जमा करण्याचा ठरविले असून असून, पुढील काही दिवसांमध्ये शस्त्रे जमा करण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या 

HUL Layoffs | हिंदुस्तान युनिलिव्हरचा मोठा निर्णय, ७,५०० कर्मचाऱ्यांना नारळ, कारण काय?
ठरलं तर! शिरूर मधून आढळराव पाटीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार : अजित पवारांची घोषणा
बीड : बजरंग सोनवणे यांचा अजित पवार गटाला धक्‍का; सदस्‍यत्‍वाचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात असणार्‍या पंचवीस पोलिस स्टेशन हद्दीत 1हजार 544 शस्त्र परवाना धारक असून त्यांच्याकडे 1हजार 691 शस्त्रे असल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगणार्‍यांना पुणे पोलिस आयुक्तालयातून परवाना देण्यात येतो; पण परवाना कोणाला द्यायचा हे पोलिसांकडून ठरवले जाते. शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून शहानिशा केली जाते. रायगड जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजक, काही राजकीय व्यक्ती यांना शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे. शहरातील दीड हजारांपेक्षा जास्त जणांना हा शस्त्रपरवाना देण्यात आला आहे. निवडणूक काळात परवाना असलेली शस्त्रे जप्त केली जातात.
निवडणूक प्रक्रियेशी संबंधित व्यक्तींकडून निवडणूक प्रक्रिया सुरू असताना प्रक्रियेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्याकडून शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परवानाधारकांकडून निवडणुकांपूर्वी शस्त्रे जमा करण्यास सुरुवात केली जाते. पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त आणि विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून परवानाधारक शस्त्रे बाळगणार्‍यांची शहानिशा करण्यात येते.
निवडणूक प्रक्रियेशी संबंध असलेल्यांकडून शस्त्रे जमा करण्याची सूचना पोलिस ठाण्यांना देण्यात येते. त्यानंतर शस्त्र जमा करण्यास सुरुवात करण्यात येते. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
Latest Marathi News निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंधराशे अग्नीशस्त्रे होणार जमा Brought to You By : Bharat Live News Media.