ठरलं तर! शिरूर मधून आढळराव पाटीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार : अजित पवारांची घोषणा
राजगुरुनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्याचे ठरले आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राजगुरूनगर येथील पक्ष मेळाव्यात केली. शिवसेनेच्या वरिष्ठांच्या संमतीने आढळरावांना पक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करण्यात येत आहे.या जागेसाठी दिलीप वळसे पाटील, नाना पाटेकर, प्रदीप कंद, विलास लांडे या सगळ्यांच्या बाबतीत विचार झाला. आढळराव पाटील यांचे ठरले आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपल्या विचारांचा आणि केंद्रात सत्ता असलेल्या प्रतिनिधींचा फायदा विकास कामे करायला होतो. हलक्या कानाचे होऊ नका. आढळराव पाटील यांच्याशी चर्चा करून आता पक्षात घेण्याचे व उमेदवारी देण्याचे ठरले आहे. असेही अजित पवार म्हणाले.
मागच्या वेळी डॉ.अमोल कोल्हे यांना खासदार केले. त्यांनी अडीच वर्षात राजीनामा देऊ केला. लोकं गावोगावी बोलावतात. मालिका , चित्रपट सोडुन मी कसा जाणार? असे म्हणत होते. त्यांचा अनुभव मी आणि तुम्ही घेतला. कसेतरी एवढी टर्म काढा म्हटलो. त्यांचा राजकारण पिंड नाही. आम्ही सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत लोकांसाठी काम करतो. त्यांना ते जमत नाही, पेलवत पण नाही. त्यांचे हे काम नाही. आता गावोगावी जातात पण लोकं जमत नाहीत. दौरा अर्धवट सोडुन परत जावे लागतेअशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर चे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वर केली आहे.
हेही वाचा
Lok sabha Elections 2024 : मध्य प्रदेशात भाजपची प्रचारात आघाडी
मोठी कारवाई | भुसावळ येथे 73 लाखाचे मेथाक्वालोन ड्रग्स जप्त, दोघांना अटक
आणखी एक ठाकरे चोरण्याचा भाजपचा प्रयत्न : उद्धव ठाकरे
Latest Marathi News ठरलं तर! शिरूर मधून आढळराव पाटीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार : अजित पवारांची घोषणा Brought to You By : Bharat Live News Media.