बीड : बजरंग सोनवणे यांचा अजित पवार गटाला धक्का; सदस्यत्वाचा राजीनामा
बीड ; Bharat Live News Media वृत्तसेवा बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वचाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सादर केला असून, आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश निश्चित झाल्याचे दिसत आहे.
आज दुपारी ते शरद पवार यांची देखील भेट घेणार असून, यावेळी हा प्रवेश होईल असे मानले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ज्योती मेटे की बजरंग सोनवणे हा प्रश्न सध्या तरी कायम आहे.
हेही वाचा :
Lok Sabha Election : पहिल्या लोकसभा निवडणुकीवर किती झाला होता खर्च?
Lok Sabha Election 2024 | छोट्या-छोट्या बाबींवर प्रशासनाचे लक्ष; ज्येष्ठांसाठी घरबसल्या पोस्टल मतदानाची सुविधा
केजरीवालांना वारंवार ‘समन्स’, हायकोर्टाने ‘ईडी’कडून मागितले उत्तर
Latest Marathi News बीड : बजरंग सोनवणे यांचा अजित पवार गटाला धक्का; सदस्यत्वाचा राजीनामा Brought to You By : Bharat Live News Media.