‘विसरला तर नाही ना आम्हाला?’ ‘मिर्जापूर ३’ ची पहिली झलक समोर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Mirzapur 3 चे पहिले फुटेज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओने जारी केलं आहे. (Mirzapur 3) यामध्ये पंकज त्रिपाठी विचारत आहे, ‘विसरला तर नाही ना आम्हाला?’ त्याच्यासोबत अली फजल, रसिका दुग्गल, विजय वर्मा देखील दिसले. (Mirzapur 3)
फॅन्स ‘मिर्जापूर ३’ ची प्रतीक्षा करताना दिसत आहे. पंकज त्रिपाठीची भूमिका कालीन भैया इतकी गाजली की, पंकज त्रिपाठीचे कोणताही फोटो समोर आला तरी कालिन भैय्याचीच आठवण होते. प्राइम व्हिडिओने आथा फॅन्ससाठी ‘मिर्जापूर ३’ ची पहिली झलक दाखवली आहे. १९ मार्च रोजी #AreYouReady इव्हेंटचे आयोजन मुंबईमध्ये केले होते. यावेळी प्राईम व्हिडिओने ७० चित्रपट आणि सीरीजच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये एक ‘मिर्जापूर ३’ देखील होता.
Latest Marathi News ‘विसरला तर नाही ना आम्हाला?’ ‘मिर्जापूर ३’ ची पहिली झलक समोर Brought to You By : Bharat Live News Media.